एक्स्प्लोर

India vs Australia 2023 World Cup Final : वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पहिल्या 15 ओव्हरमध्ये 'फिप्टी-फिप्टी'चा मामला! रोहित अन् श्रेयस बाद झाल्याने मैदानात सन्नाटा

India vs Australia 2023 World Cup Final : रोहित शर्मा या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला.

India vs Australia 2023 World Cup Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर रोहितने अल्पावधीतच नवा विश्वविक्रम केला. रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माने नवा विक्रम केला

रोहित शर्मा या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांना मागे टाकले आहे.

  • केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या.
  • महेला जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या.
  • रिकी पाँटिंगने 2003 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 539 धावा केल्या होत्या.
  • आरोन फिंचने 2019 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून 507 धावा केल्या होत्या.

टीम इंडिया अडचणीत

मात्र, या सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हे वृत्त लिहेपर्यंत टीम इंडियाने 16 षटकांत 3 गडी गमावत 101 धावा करून आपल्या तीन मुख्य विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाकडून शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहितने 31 चेंडूत 47 धावा केल्या, पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली. रोहित बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात फलंदाज श्रेयस अय्यरही केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा स्थितीत टीम इंडियाच्या आशा आता क्रीजवर असलेल्या विराट कोहली आणि केएल राहुलवर टिकून आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Live Streaming : 40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z
40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z
Rashid Khan : रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Playing 11 : भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Embed widget