Yogi Adityanath: लखनऊमध्ये 36 व्या अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी क्रिकेटच्या मैदानावर योगी आदित्यनाथ यांची वेगळीच शैली पाहायला मिळाली. योगी आदित्यनाथचा व्हिडीओही समोर आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी चांगल्या प्रकारे क्रिकेटमधील स्विप शॉट खेळला. योगी आदित्यनाथ यांचा हा फटकार पाहून उपस्थित असणारे सर्व अवाक झाले.






अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) म्हणाले की, खेळ आपल्या सर्वांना सांघिक भावनेने काम करण्याची प्रेरणा देतो, मग ते आपले कौटुंबिक जीवन असो किंवा सार्वजनिक जीवन. जर आपल्यात सांघित काम करण्याची क्षमता असेल तर यशाची शक्यता जास्त असते. खेळ, सर्वप्रथम, आपल्याला विषम आणि सम परिस्थितींमध्ये सांघिक भावनेने लढण्याची नवी प्रेरणा देतो, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.


योगी आदित्यनाथ यांनी या दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी आज लखनऊमध्ये आयोजित 36 व्या अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो. गेल्या 10 वर्षात आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशात क्रीडा उपक्रमांचा विस्तार झाला आहे. 'खेलो इंडिया', 'फिट इंडिया मूव्हमेंट' आणि 'संसद क्रीडा स्पर्धा' याचा पुरावा आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 






राज्य सरकारने वकिलांच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या-


खेल इंडिया खेलो, फिट इंडिया असो की संसद क्रीडा स्पर्धा जिथे त्यांनी क्रीडा संस्कृती पुढे नेली. यामध्ये युवक पुढे येत असून शासनानेही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न केले आहेत. आत्ताच गेल्या आठवड्यात आम्ही ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या आणि देशासाठी पदके जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंना लखनऊमध्ये आमंत्रित केले आणि त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारने वकिलांच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या आहेत आणि अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. ॲडव्होकेट वेलफेअर फंडाची रक्कम वाढवण्याचे काम असो, आता कोणत्याही वकिलाच्या आकस्मिक निधनानंतर जी रक्कम आधी दीड लाख होती, ती वाढवून आम्ही 5 लाख केली आहे.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ