Koyna Dam : कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आज दुपारी तीन वाजल्यापासून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याने सांगली-कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. अलमट्टीमधून जरी मोठा विसर्ग सुरू असला, तरी कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पातळीत संध्याकाळपासून काही फुटांमध्ये वाढ होऊ शकते.
दुसरीकडे जिल्ह्यातील वारणा धरणात 31.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. वारणा धरणातून 9 हजार 400 तर अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात (टीएमसी) प्रमाणात पुढीलप्रमाणे
कोयना 83.50 (105.25), धोम 10.98 (13.50), कन्हेर 8.65 (10.10), वारणा 31.21 (34.40), दूधगंगा 21.55 (25.40), राधानगरी 9.29 (8.36), तुळशी 3.22 (3.47), कासारी 2.28 (2.77), पाटगांव 3.34 (3.72), धोम बलकवडी 3.75 (4.08), उरमोडी 8.69 (9.97), तारळी 5.25 (5.85), अलमट्टी 111.64 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे
कोयना - निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 6404 वारणा - 9400, दुधगंगा - 4772, राधानगरी - 4456, तुळशी - निरंक, कासारी - 250 पाटगांव -250, धोम बलकवडी - 1117, उरमोडी - 3112, तारळी - 1880 व अलमट्टी धरणातून - 2 लाख क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे
कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 26.6 (40) व अंकली पूल हरिपूर 32.2 (45.11)
इतर महत्त्वाच्या बातम्या