Asia Cup 2022: आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशियातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा यूएईमध्ये (UAE) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं (BCCI) भारतीय संघाची घोषणाही केलीय. दरम्यान, आशिया विश्वचषकात (Asia Cup) भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) विराट कोहलीचा (Virat Kohli) खास विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. 

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं एकूण 41 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 30 सामने जिंकले आहेत. तर, आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितनं आतापर्यंत 29 सामने जिंकले आहेत. यामुळं आशिया चषकात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माकडं विराट कोहलीला मागं टाकण्याची संधी आहे. 

आशिया चषक 2022 चं वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात केल्यानंतर भारतीय संघानं इंग्लंड दौरा केला. या दौऱ्याद भारतीय संघानं दमदार कामगिरी केली. इंग्लंडनंतर भारतानं वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकेतही 4-1 असा विजय नोंदवला.  भारतीय संघ यूएईमध्ये 2022 आशिया चषकाचं विजेतेपद काबीज करू इच्छित आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. 

हे देखील वाचा-