एक्स्प्लोर

बुमराच्या 5 विकेट्स, श्रीलंकेला 217 धावांवर रोखलं

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

कॅण्डी : भारताच्या जसप्रीत बुमराने 27 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून, कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेला नऊ बाद 217 धावांत रोखलं. त्यामुळे हा सामना आणि मालिकाही जिंकायची, तर टीम इंडियासमोर 50 षटकांत 218 धावांचं लक्ष्य आहे. लहिरू थिरीमनेच्या 80 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर पुन्हा नांगी टाकली. त्यात जसप्रीत बुमराने पाच विकेट्स काढून श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेतही चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता. भारत आणि श्रीलंका संघांमधला तिसरा वन डे सामना कॅण्डीच्या मैदानात खेळवला जात आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असली, तरी श्रीलंकेला कमी लेखता येणार नाही. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत तर धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीमुळेच टीम इंडिया पराभवाच्या संकटातून बालंबाल बचावली. दम्बुलापाठोपाठ कॅण्डीच्या वन डेतही विजय साजरा करुन विराट कोहलीच्या फौजेने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका संघ कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर तिसऱ्या वन डेत पुन्हा आमनेसामने आला आहे. ही वन डे जिंकून टीम इंडियाला पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची नामी संधी आहे.

हळदीच्या अंगाने मैदानात, धनजंयच्या 6 विकेट्स मागची कहाणी

कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलने श्रीलंकेची फलंदाजी ही कचकड्याची असल्याचं दाखवून दिलं. पण त्यानंतर अकिला धनंजयने दिलेले धक्के लक्षात घेता टीम इंडिया श्रीलंकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही.

'विघ्नहर्ता' भुवनेश्वर 53*, संकटमोचक धोनी 45*, भारताचा विजय!

धोनीच्या या कामगिरीने त्याच्यातला टीम इंडियाचा विघ्नहर्ता, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं तर त्याच्यातला मॅचफिनिशर अजूनही जागता असल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारनं सरळ बॅटनं खेळून झळकावलेलं नाबाद अर्धशतक हे त्याच्यातल्या फलंदाजांची सुखद जाणीव करून देणारं ठरलं.

टीम इंडियाचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय, धोनी ठरला मॅचफिनिशर

धोनी आणि भुवी या जोडीनं प्रतिकूल परिस्थितीत रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं टीम इंडियाला नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. हा आत्मविश्वास विराटच्या फौजेला तिसऱ्या वन डेसह मालिका जिंकून देण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरु शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

Ind beat Afg 2nd T20 : संजूची वादळी बॅटिंग, अफगाणिस्तानचा धुव्वा; 15 षटकांत खेळ संपवला, श्रेयसच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा
संजूची वादळी बॅटिंग, अफगाणिस्तानचा धुव्वा; 15 षटकांत खेळ संपवला, श्रेयसच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा
Ind vs Afg 2nd T20 Live : दिल्लीत श्रेयसच्या सेनेचा धुमाकूळ; 5 षटके आधीच ठोकला विजय, अफगाणिस्तानला लोळवत भारताने कोरले मालिकेवर नाव
दिल्लीत श्रेयसच्या सेनेचा धुमाकूळ; 5 षटके आधीच ठोकला विजय, अफगाणिस्तानला लोळवत भारताने कोरले मालिकेवर नाव
Sofia Hayat on Rohit Sharma : रोहित शर्माला डेट केलं, पण... अभिनेत्रीने बेडरूम सीक्रेट सांगत केले बोल्ड वक्तव्य; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाली?
रोहित शर्माला डेट केलं, पण... अभिनेत्रीने बेडरूम सीक्रेट सांगत केले बोल्ड वक्तव्य; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाली?
India Squad For West Indies ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलणार; अर्ध्या संघाला डच्चू, कोणाला मिळणार संधी? नावाची लिस्ट आली समोर
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलणार; अर्ध्या संघाला डच्चू, कोणाला मिळणार संधी? नावाची लिस्ट आली समोर

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Nagpur Crime: खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Patil in Beed: मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी चौक खचाखच भरला, मराठा बांधवांची गर्दी
मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंनी चौक खचाखच भरुन टाकला, मराठा बांधवांची गर्दी
Sara Tendulkar on Ganeshotsav: दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
Embed widget