IND vs SA 1st ODI LIVE : रोहित अन् विराटविना टीम इंडिया मैदानात; यंग ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार
IND vs SA 1st ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, मात्र एकदिवसीय मालिकेत केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
टीम इंडियाचा धमाकेदार विजय
गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर साई सुदर्शन अन् श्रेयसची शानदार फलंदाजी
तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
अर्शदीप सिंगचे पाच बळी
आवेश खानचे 4 बळी
साई सुदर्शनचे पदार्पणात नाबाद अर्धशतक
श्रेयस अय्यरचं शानदार अर्धशतक
टीम इंडियाच्या 10 षटकात 1 बाद 61 धावा
श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन मैदानात
टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल
117 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का
ऋतुराज गायकवाड 5 धावांवर बाद
टीम इंडियाच्या डावाची सुरवात
साई सुदर्शनचा पर्दापणाच्या सामन्यात पहिल्याच बाॅलवर चौकार!
टीम इंडियासमोर 117 धावांचे माफक आव्हान
अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला. 'द वांडरर्स' येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय आत्मघातकी ठरला.
अर्शदीप सिंगने घेतलेल्या 5 पाच विकेटमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत
दक्षिण आफ्रिका 26 षटकांत 9 बाद 105 धावा
अँडिले फेहलुकवायोनं केलेल्या प्रतिकारानं दक्षिण आफ्रिकेनं कशीबशी शंभरी पार केली आहे. 25व्या षटकांत आफ्रिकेच्या 100 धावा
अर्शदीपनंतर आवेशकडूनही दक्षिण आफ्रिकेला सलग चार झटके
दक्षिण आफ्रिकेचा डाव कोलमडला
दक्षिण आफ्रिकेची 8 बाद 74 अशी अवस्था
दक्षिण आफ्रिकेला सातवा झटका; अर्शदीपनंतर आवेश खानची सलग तिसरी विकेट
दक्षिण आफ्रिका 13 षटकात 7 बाद 52
अर्शदीप 4 विकेट
आवेश खान 3 विकेट
अर्शदीपनंतर आवेश खानकडून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झटका; तब्बल 6 फलंदाज 52 धावांत गारद
अर्शदीप सिंग 4 विकेट
आवेश खान 2 विकेट
दक्षिण आफ्रिका 6 बाद 52
अर्शदीप सिंगची टी-20 मधील धुलाईची वनडेमध्ये भरपाई; दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका. दक्षिण आफ्रिका 10.1 षटकात 5 बाद 52 धावा
अर्शदीप सिंगला चार विकेट
आवेश खानला एक विकेट
अर्शदीप सिंगचा दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका; टोनी डी झोर्झी बाद; दक्षिण आफ्रिका 3 बाद 42
सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन एकाच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगची शिकार
दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, रीझा हेंड्रिक्स शुन्यावर बाद; अर्शदीप सिंगला पडली पहिली विकेट
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पार्श्वभूमी
IND vs SA 1st ODI LIVE : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून (17 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेत नवीन सुरुवात करणार आहे. विश्वचषक फायनलनंतर प्रथमच टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये मैदानात उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आहे. टीम इंडियाकडून साई सुदर्शननं पर्दापण केलं आहे. संजू सॅमसनला संघात संधी देण्यात आली आहे. पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्गमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता खेळवला जाईल. सामन्याची नाणेफेक 1 वाजता होणार आहे. भविष्य डोळ्यासमोर ठेवून या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, मात्र एकदिवसीय मालिकेत केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात समावेश नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू नाहीत.
खेळपट्टी कशी असेल?
जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर खूप धावा केल्या जातात. आजही उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे तेच मैदान आहे जिथे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 434 धावा केल्या होत्या आणि त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक आव्हानाचा पाठलाग करत 438 धावा केल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -