एक्स्प्लोर

England ODI Squad Announced: इंग्लंडला मोठा धक्का, एकदिवसीय मालिकेआधी 'हे' दिग्गज खेळाडू संघाबाहेर

England ODI Squad Announced: टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान उद्या 23 मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

England ODI Squad Announced: टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान उद्या 23 मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं माघार घेतली आहे तर संघात जो रुट आणि ख्रिस वोक्सला संधी मिळालेली नाही.  इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीनुसार हे दोन खेळाडू संघाबाहेर असतील.  जेक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलान हे तीन राखीव खेळाडू इंग्लंडच्या एकदिवसीय संघासह पुण्याला रवाना झाले आहेत.

आर्चर आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकणार
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या दौर्‍यासाठी आर्चर उपलब्ध नसल्याची माहिती इंग्लंडच्या वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली. कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आर्चर उपचारांसाठी इंग्लंडला परतणार आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत तो सहभागी झाला होता. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेत चांगरी कामगिरी करण्यात अडचण आल्याचं ईसीबीने म्हटलं आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चरला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, "बोर्डाची वैद्यकीय टीम आर्चरची देखरेख करील आणि उपचारानंतरच तो परत येईल. या कारणास्तव आर्चर आयपीएल 2021 चे सुरुवातीचे सामना खेळू शकणार नाही."
 
असा असेल इंग्लंडचा संघ

इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीसी टॉपले, मार्क वूड

एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे वनडे मालिका रिकाम्या स्टेडियममध्येच खेळली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. या संघात सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, क्रुणाल पांड्या, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत आणि शुभमन गिल अशा अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या रूपात काही सिनियर खेळाडूही आहेत.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला वनडे - 23 मार्च (पुणे)

दुसरा वनडे - 26 मार्च (पुणे)

तिसरा वनडे - 28 मार्च (पुणे)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget