IND vs ENG भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असणारी कसोटी मालिका निकाली निघाली आणि भारतीय क्रिकेट संघानं यात बाजी मारली. ज्यानंतर आता क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याच्या पत्नीनं म्हणजेच प्रीती अश्विन हिनं एक भावनिक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.


भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू जवळपास मागील पाच महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाचा मोठा दौरा आणि त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंसोबत झालेली ही मालिका अशा प्रदीर्घ कालावधीसाठी हे खेळाडू बायो बबलमध्ये आहेत. त्यातच आता ही कसोटी मालिका संपली असल्यामुळंच भावूक होत अश्विनच्या पत्नीनं एक लक्षवेधी ट्विट केलं.


IPL 2021 Schedule | आयपीएलच्या 14व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरुवात; यंदा आयपीएल भारतातच


आता बायो बबलच्या नियमांतून बाहेर पड, आणि घरी ये.... असं म्हणत तिनं आपल्या भावनांना ट्विटच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. सामनावीर अश्विनचा फोटो पोस्ट करत तिनं हे ट्विट केलं.





बायो बबलबाबत अश्विन म्हणतो...


इंग्लंडविरोधातील अंतिम कसोटी सामन्यानंतर अनेकांनीच बायो बबलबाबत मोकळेपणाने भाष्य केलं. याचबाबत सांगताना अश्विन म्हणाला, मागील सहा महिन्यांपासून त्याचत्याच चेहऱ्यांना पाहतोय. आता मात्र बायो बबल तोडण्याची वेळ आली आहे. हो मी जाणतो हे फक्त तीन आठवड्यांपुरताच सीमीत असेल, असं तो म्हणाला होता.


अश्विननं गाजवली कसोटी मालिका


इंग्लंडविरोधात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये रविचंद्रन अश्विनची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेमध्ये त्यानं सर्वाधिक गडी बाद करण्याची कमाल केली. याशिवाय तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं शतकीय खेळीचंही प्रदर्शन केलं होतं. अश्विनची ही कामगिरी पाहता भारतीय कसोटी क्रिकेटमधील त्याच्या योगदानाप्रती क्रीडारसिकांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.