IND Vs ENG 2nd ODI : भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाची संधी
तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. जर आजच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यास भारताला इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवण्याची संधी मिळेल
India vs England 2nd OD I: भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यास भारताला इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवण्याची संधी मिळेल.
श्रेयस अय्यर खांद्याला दुखापत झाल्याने वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता श्रेयसच्या जागेवर कोणाला संधी मिळणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. टी-२० मध्ये चमकलेला सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्णधार इयॉन मॉर्गनला दुखापत झाल्याने वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता मॉर्गनच्या जागेवर विकेटकीपर जोस बटलर संघाचे नेतृत्त्व करणार आहेत. तर सॅम बिलिंग्स देखील दुखापतीमुळे दुसरा वनडे सामना खेळणार नाही. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या वन डे सामन्या दरम्यान इजा झाली होती.
इयॉन मॉर्गनच्या जागेवर डेविड मलानला संधी मिळण्याची शक्यात आहे. मलान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची अधिक शक्यता आहे. तर सॅम बिलिंग्सच्या जागेवर लियाम लिविंगस्टोनला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉश्गिंटन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकुर.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेविड मलान, रीस टोप्ले आणि मार्क वुड.