Ind vs Aus | ब्रिस्बेनच्या हॉटेलवर भारतीय संघाला नाकारल्या मुलभूत सेवा
चौथ्या कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे पोहोचला. पण, यानंतर भलत्याच अडचणी समोर उभ्या ठाकल्यामुळं आता थेट भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीयाला यात डोकावावं लागलं आहे.
![Ind vs Aus | ब्रिस्बेनच्या हॉटेलवर भारतीय संघाला नाकारल्या मुलभूत सेवा Ind vs Aus Indian Cricketers Denied Housekeeping Room Services Swimming Pool At Brisbane Hotel says Reports Ind vs Aus | ब्रिस्बेनच्या हॉटेलवर भारतीय संघाला नाकारल्या मुलभूत सेवा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13145029/team-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ind vs Aus (India vs Australia) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे पोहोचला. पण, यानंतर भलत्याच अडचणी समोर उभ्या ठाकल्यामुळं आता थेट भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीयाला यात डोकावावं लागलं आहे.
भारतीय संघाला ब्रिस्बेन येथील Sofitel Brisbane Central hotel मध्ये थांबवण्यात आलं. पण, इथं त्यांना हाऊसकिपिंग सर्व्हिसची कामं स्वत:हून करणं अपेक्षित असल्याचंही सांगण्यात आलं. ज्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डानं यात मध्यस्ती करत सदर प्रकरणा लक्ष घातलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी यासंबंधीची तक्रार मिळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला. ज्यानंतर भारतीय संघाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचं आवाहन त्यांना देण्यात आलं.
बोर्डाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघ वास्तव्यास असणाऱ्या हॉटेलमध्ये रुम सर्व्हिस अथवा हाऊसकिपिंग नाही, स्विमिग पूलच्या वापरास परवानगी नाही शिवाय जीमची सुविधाही अद्ययावत नाही. कोणत्याही प्रकारचा कोविड सामूहिक संसर्ग टाळण्यासाठीच हे निर्बंध लावण्यात आल्याचं कळत आहे. सध्याच्या ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचं संकट दिसत असून, इथंले काही भाग हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहेत.
IND vs AUS | असभ्य वर्तनासाठी टीम पेननं मागितली भारतीय क्रिकेट संघाची माफी
दरम्यान, भारतीय संघ ब्रिस्बेनला जाणार नाही, अशा चर्चा होत्या. पण, बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा देण्यात आली नव्हती. तिथं सिडनीहून क्वीन्सलँडमध्ये दाखल झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना सक्तीच्या विलगीकरण नियमांचं पालन करावं लागत आहे. क्वीन्सलँडमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढलेले कोरोना रुग्ण पाहता परिस्थितीचं गांभीर्य पाहताच तिथं कोरोनाबाबतची सावधगिरी आणि त्यासाठीचे नियम सक्तीनं पाळले जात आहेत.
कोरोनाचं संकट पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले नियम आणि त्यामुळं भारतीय क्रिकेट संघाला होणाऱ्या अडचणींवर आता बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संवाद साधत नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)