एक्स्प्लोर
पंचांची पुन्हा खराब कामगिरी, केएल राहुल 'नो बॉल'वर आऊट!
बंगळुरु: भारत आणि इंग्लंड सामन्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा पंचांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. नागपूर टी-20मध्येही शेवटच्या षटकात जो रुटबाबत खराब निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे पंचांच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांकडून टीका होत आहे.
तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. सलामीवीर विराट कोहली अवघ्या दोन धावांवर रनआउट झाला. त्यानंतर 8व्या षटकात दुसरा सलामीवीर केएल राहुलही बेन स्टोक्सच्या चेंडूवर बोल्ड झाला.
या मालिकेत पंचाच्या खराब कामगिरीचा खेळाडूंना बऱ्याचदा फटका बसला. कालच्या सामन्यातही केएल राहुल पंचांच्या खराब निर्णयाचा बळी ठरला. ज्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला तो चेंडू खरं तर 'नो बॉल' होता. पण पंचांचं स्टोक्सच्या नो बॉलकडे लक्षच गेलं नाही. त्यामुळे राहुलला पव्हेलियनमध्ये परत जावं लागलं.
कर्णधार विराट कोहली 4 धावांवर बाद झाल्यानंतर रैनानं राहुलच्या साथीनं भारताचा स्कोअर 50 धावांच्या पुढं नेला. 8व्या षटकात केएल राहुलनं शानदार फटकेबाजी केली. या षटकात राहुलनं 2 चौकार आणि 1 षटकारही ठोकला. पण स्टोक्सला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बोल्ड झाला. राहुल 22 धावांवर बाद झाला. पण याचवेळी पंच अनिल चौधरींचं स्टोक्सच्या नो बॉलकडे दुर्लक्ष झालं. रिप्लेमध्ये हा नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं पण तोवर फार उशीर झाला होता.
दरम्यान, नागपूरच्या सामन्यात शेवटच्या षटकात बुमरानं रुटला एलबीडब्ल्यू बाद केलं. पण जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला त्यावेळी रुट नाबाद असल्याचं स्षट झालं. हा सामना भारतानं 5 धावांनी जिंकला होता. कालच्या बंगळुरुमधील सामन्यातही भारतानं इंग्लंडवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-20 मालिका 2-1 नं खिशात घातली.
संबंधित बातम्या:
पंचांच्या वादग्रस्त निर्णयानंतर रुट म्हणतो....
8 धावात 8 विकेट, क्रिकेटचा 71 वर्षांचा इतिहास पुसला!
चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!
चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!
तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement