T20 WC 2021 : दक्षिण आफ्रिकेने (South Africa) वेस्ट इंडिजचा (West Indies)आठ विकेट्सनी धुव्वा उडवून  ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिल्या गटातला दुसरा सामना होता. या गटातल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पाच विकेट्सनी हार स्वीकारावी लागली होती. विंडीजविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी कमाल केली. 


दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसनं तीन आणि केशव महाराजानं दोन विकेट्स काढून विंडीजला आठ बाद  143 धावांत रोखलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी आवश्यक 144 धावांचं लक्ष्य दहा चेंडू राखून गाठलं. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमनं नाबाद 51 आणि रासी वॅन डेर ड्यूसेननं नाबाद 43 धावांची खेळी केली.  रीजा हेंड्रिक्सने चांगवा फलंदाजी करत चाक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 30 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर अकिल हुसैनच्या चेंडूवर बाद झाला. 


दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्टइंडिजची सुरुवात चांगली नाही. वेस्टइंडिजच्या टीमने पावरप्लेमध्ये  एकही विकेट न गमवता 43 धावा केल्या.  एविन लुईसने शानदार फलंदाजी करत तीन चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. त्यानंतर लुईसला केशव महाराजने बाद केले. लुईस बाद झाल्यानंतर वेस्टइंडिजची एकानंतर एक फलंदाज बाद झाले. त्यानंतर निकोलन पुरन पूरन (12), क्रिस गेल (12) आणि किरोन पोलार्ड (26) धावा कर तंबूत परतले. वेस्टइंडिजच्या संघाने 20 षटकात आठ विकेट गमावत 143 धावा केल्या. 


संबंधित बातम्या :