Dearness Allowance Benefit : दिवाळी धनत्रयोदशीच्या (Diwali Dhanteras ) सणाआधी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Government Employees) खूशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता भत्ते (Dearness Allowance)मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आला आहे, जो 1 जुलै 2021 पासून लागू होईल. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने (Expenditure Department) म्हटले आहे की 'मूलभूत वेतन' म्हणजे 7 व्या वेतन आयोगानुसार मिळालेला पगार आणि त्यात इतर कोणतेही विशेष वेतन किंवा भत्ते समाविष्ट नाहीत.


तिजोरीवर 9488.70 कोटींचा बोजा पडणार
खर्च विभागानुसार, (Expenditure Department) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून मूळ वेतनाच्या सध्याच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर एकूण 9,488.70 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या वाढीचा फायदा संरक्षण सेवेतून पगार मिळणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे, तर संरक्षण आणि रेल्वे मंत्रालय सशस्त्र दलातील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात स्वतंत्र आदेश जारी करणार आहेत.



लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ
या निर्णयाचा फायदा सुमारे 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. या वर्षी जुलैमध्ये डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला होता. आता तीन टक्क्यांच्या वाढीसह डीएचा दर 31 टक्के होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) सध्याच्या 28 टक्क्यांवरून तीन टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली होती.