ICC ODI Ranking Top 10 Batsmen: इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC)कडून एकदिवसीय क्रिकेटमधील ताज्या क्रमवारीची घोषणा केली आहे. आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराटच्या जवळ पोहोचला असून दोघांच्या अंकांमध्ये कमी अंतर राहिले आहे.  


भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने वेस्टइंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक केलं होतं. सध्या कोहली 828 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर रोहित  807 रेटिंग अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. 


फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानी कर्णधार  बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. तर पाकिस्तानचा फखर जमान आणि इंग्लंडचा जो रूट टॉप 10मध्ये पोहोचले आहे.  


अव्वल दहामध्ये रोहित आणि कोहली हे दोन भारतीय खेळाडू आहेत, तर शिखर धवन एका स्थानाने घसरून 14 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 873 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान, केएल राहुल 25 व्या स्थानावर कायम आहे, तर ऋषभ पंत 77 व्या स्थानावर आहे.
 
गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानावर आहे.  भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल 17 व्या स्थानावर आहे, तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 20 व्या आणि  मोहम्मद शमी 25 व्या स्थानावर आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या