Indian Badminton Players Rankigs:  बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंग मंगळवारी जाहीर झाली असून जवळपास सर्व स्टार भारतीय शटलर्सला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) महिला एकेरीत सातव्या क्रमांकावर पोहचली आहे. लक्ष्य सेननंही (Lakshya Sen) टॉप-10 मध्ये आपलं स्थान कायम राखलंय. याचबरोबर एचएस प्रणॉय (HS Prannoy) आणि किदाम्बी श्रीकांत (Kidambi Srikanth) यांनी पुरुष एकेरी क्रमवारीत प्रत्येकी दोन स्थानांनी झेप घेतलीय.


पीव्ही सिंधूची एका तर, सायना नेहवालची तीन स्थानांनी झेप
दुखापतीमुळं वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि जपान ओपनला मुकलेल्या पीव्ही सिंधूला बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. ज्यामुळं पीव्ही सिंधू सातव्या क्रमांकावर पोहचलीय. तर, लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालनं तीन स्थानांची झेप घेत टॉप-30 मध्ये स्थान मिळवलंय.


एसएस प्रणॉय 16व्या स्थानावर
प्रणॉयनं मागील काही महिन्यांत आपल्या खेळात सातत्य राखत दमदार प्रदर्शन केलंय. त्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर जपान ओपन सुपर 750 च्या उपांत्यपूर्व फेरीतही प्रवेश केला होता. त्यानं आतापर्यंत 33 स्पर्धा खेळल्या असून त्याचे एकूण 64, 330 गुण आहेत. प्रणॉय हा 'रेस टू ग्वांगझू'मध्ये पुरुष एकेरीत अव्वल खेळाडू होता, ज्याचा फायदा त्याला बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये झाला आणि तो 16व्या स्थानावर पोहचलाय. 


किदाम्बी श्रीकांत 12 व्या तर, लक्ष्य सेन 9व्या स्थानावर
पुरूष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला दोन स्थानांचा फायदा झालाय.बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये तो 12व्या स्थानावर पोहचलाय. तर, लक्ष्य सेन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप-10 मध्ये असणार एकमेव भारतीय खेळाडू आहे. 


चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रँकीरेड्डी जोडी आठव्या स्थानावर कायम
पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी हे वर्ल्ड रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहेत. या जोडीनं कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिलं कांस्य पदक जिंकलंय. 


अश्विनी पोनप्पा- एन सिक्की रेड्डी जोडीची 28व्या स्थानावर घसरण
अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांची महिला दुहेरीच्या क्रमवारीत 28व्या स्थानावर घसरण झालीय. तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर या मिश्र दुहेरीच्या जोडीनं दोन स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 33 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.


हे देखील वाचा-