Twitter Deal : ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला-स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या $44 अब्ज बायआऊट खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरने मंगळवारी सांगितले की, जरी एलॉन मस्क हा करार रद्द करण्याचा प्रयत्न करत असले तरी, शेअरहोल्डर्सनी ट्विटरला $44 अब्जमध्ये विकत घेण्याच्या बोलीला सहमती दर्शविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात शेअरहोल्डर्सची बैठक पार पडली. ट्विटरने करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.


जगभरात या कराराची जोरदार चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून या कराराची जगभरात जोरदार चर्चा सुरू होती. यापूर्वी, ट्विटर विकत घेण्यासाठी $44 अब्ज ऑफर मागे घेत असल्याचं एलॉन मस्क यांनी जाहीर केले होते. याचे कारण म्हणजे फेक अकाऊंटच्या संख्येबाबत पुरेशी माहिती देण्यात कंपनी अपयशी ठरली होती. त्याच वेळी, ट्विटरने सांगितले की, ते हा करार कायम ठेवू इच्छित आहे आणि यासाठी एलोन मस्कवर खटला दाखल करणार आहे. 


बनावट, स्पॅम आणि बॉट अकाऊंटने भरलेला ट्विटर - एलॉन मस्क


एलॉन मस्क यांनी यापूर्वी म्हटले होते की, ट्विटर हे बनावट, स्पॅम आणि बॉट अकाऊंटने भरलेले आहे. याच कारणामुळे त्यांनी ट्विटरसोबतचा करार मोडण्याचा आग्रह धरला. मंगळवारी त्यांनी पुन्हा ट्विटरला घेरले आणि ट्विटमध्ये लिहिले की, 'ट्विटरवरील 90 टक्के कमेंट्स एकतर फेक आहेत किंवा बॉट अकाउंट्स आहेत.


 






मस्कची $ 54.20 दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर
मस्कने यापूर्वी 14 एप्रिल रोजी प्रति शेअर $ 54.20 या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. यावर, मस्कने ट्विट केले होते की, त्यांनी ट्विटर विकत घेण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे, याचे कारण साइटवरील बनावट खात्यांची वाढती संख्या आहे. गेल्या महिन्यात असे सांगण्यात आले होते की, एलॉन मस्कने मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर विकत घेण्यासाठी $ 44 अब्ज पेक्षा कमी पैसे देऊ इच्छित असल्याचे सूचित केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


IND Vs ENG 2nd T20I Women Cricket: महिला T20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा पराभव, स्मृती मंदानाची तुफानी खेळी


Karnataka : कर्नाटक पोलीस भरतीमध्ये 'ट्रान्सजेंडर'साठी कोटा निश्चित, सरकारच्या निर्णयाचं होतंय कौतुक