Virat Kohli : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. आशिया चषक सुपर-4 फेरीत भारतीय संघाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, अफगाणिस्तानचा पराभव करताना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं दमदार शतक ठोकलं, ही टीम इंडियासह सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी होती.  विराट कोहलीने या स्पर्धेतील 5 सामन्यात 276 धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने आगामी विश्वचषकात ओपनिंग करावी असं मत माजी क्रिकेटर रोहन गावस्करनं (Rohan Gavaskar) दिलं आहे.


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक 2022 आधी माजी भारतीय खेळाडू रोहन गावस्कर याने विराट कोहलीबाबत हे मोठं वक्तव्य केलं आहे.  रोहनच्या मते सलामीवीर म्हणून विराट कोहली हा एक उत्तम पर्याय आहे. विराट कोहलीचा टी20 फॉरमॅटमधील रेकॉर्डही उत्कृष्ट असल्याचं तो यावेळी म्हणाला. विराट कोहलीला सलामीची संधी दिली तर केएल राहुलसाठी वेगळी जागा शोधावी लागेल असंही रोहन म्हणाला. दरम्यान यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला (Axar Patel) संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह (Jasprit Bumrah) हर्षल पटेलही (Harshal Patel) दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...


कशी आहे टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.


राखीव खेळाडू


मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर


हे देखील वाचा-