एक्स्प्लोर

क्रिकेटच्या मैदानात न्यायमूर्तींवर वकिलांची मात

या सामन्यात वकिलांच्या संघाने न्यायमूर्तींच्या संघावर मात केली.

मुंबई : दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मुंबई हायकोर्टातील सर्व न्यायमूर्तींसह जेष्ठ वकिलांनीही शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. एरव्ही कोर्टात एकमेकांशी हुज्जत घालणाऱ्या या सर्व रथी महारथींना मैदानात खेळताना पाहण्याचा योग मिळाला. या सामन्यात वकिलांच्या संघाने न्यायमूर्तींच्या संघावर मात केली. एरव्ही काळ्या कोटात टापटीप राहणारे हायकोर्टाचे न्यायमूर्ती वानखेडे स्टेडियमवर पायाला पॅड, हातात ग्लोव्हज आणि बॅट घेऊन क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटत होते. या मैत्रिपूर्ण सामन्यात हायकोर्टातील वकिलांनी अखेरीस न्यायमूर्तींविरोधातील पराभवाचा आपला दुष्काळ संपवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात वरिष्ठ वकीलांच्या संघाने न्यायमूर्तींच्या संघावर 28 धावांनी मात करत अरविंद बोबडे स्मृतीचषकावर आपलं नाव कोरलं. टी-20 च्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वकिलांच्या संघाने 135 धावांची मजल मारली. ज्याचा पाठलाग करताना न्यायमूर्तींचा संघ 106 धावांत गडगडला. या सामन्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बोबडे यांनी 23 धावा करून सर्वोत्तम फलंदाजाचा किताब मिळवला. तर मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर. एम. सावंत यांनी 3 विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजाचा किताब मिळवला. तर अष्टपैलू कामगिरी करून वकिलांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जेष्ठ कायदेतज्ञ प्रसाद ढाके-फाळकर यांनी सर्वोत्तम खेळाडूच्या किताबाने गौरवण्यात आलं. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्याकरता मुंबई हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया कापसे-तहिलरमानी याही उपस्थित होत्या. तर न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती शंतनू केमकर, न्यायमूर्ती गवई, न्यायमूर्ती जामदार, न्यायमूर्ती अनिल मेनन, न्यायमूर्ती कर्णिक, वरिष्ठ वकिल जनक द्वारकादस, राज्याचे माजी महाधिवक्ता दरायस खंबाटा यांच्यासह इतर अनेकांनी प्रत्यक्ष मैदानावरील सामन्यात भाग घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Ind vs Eng 3rd T20I : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Embed widget