LSG Vs DC, IPL 2022: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दिल्लीविरुद्ध (Delhi Capitals) आज खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 45 व्या सामन्यात केएल राहुलनं उत्कृष्ट फलंदाजी केली. या सामन्यात केएल राहुलनं पहिला षटकार ठोकून नवा पराक्रम रचला आहे. या षटकारासह केएल राहुलनं आयपीएलमध्ये 150 षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या हंगामात काही सामने सोडले तर, तो सलग धावा करताना दिसला आहे.


दिल्लीविरुद्ध केएल राहुलचं दमदार अर्धशतक
दिल्लीविरुद्ध सामन्यात केएल राहुलनं 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. ज्यात तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. आयपीएल कारकिर्दीतील त्याचं 29 वं अर्धशतक ठोकलंय. तर, यंदाच्या हंगामातील तिसरं अर्धशतक आहे. तसेच या हंगामात त्यानं दोन शतक झळकावली आहे. आयपीएल 2022 मध्ये केएल राहुल 400 हून अधिक धावा केल्या आहेत. तर, यंदाच्या हंगामात केएल राहुल दोनदा शून्यावर बाद झालाय.


रोहित शर्मा, विराट कोहलीचा विक्रम मोडला
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 150 षटकार मारण्याचा विक्रम संजू सॅमसन नावावर होता. त्यानं आयपीएलमधील 125 डावात 150 षटकार ठोकले आहेत. तर, केएल राहुलनं 100 डावातच 150 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. या कामिगिरीसह त्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागं टाकलं आहे. रोहितनं 129 डावात तर, विराटनं 132 डावात 150 षटकार मारले आहेत. तर, या यादीत वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. 


हे देखील वाचा-