एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...आणि गांगुली माझ्यामुळे राजीनामा द्यायला तयार झाला
नवी दिल्लीः टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार हा आपल्यामुळे कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला तयार झाला होता, असा खुलासा हरभजनने केला आहे. फिरकीपटु हरभजन सिंह त्याच्या हटके स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. वाढदिवसाच्या निमीत्ताने हरभजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वाढदिवशी हरभजन टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये गेस्ट सेलेब्रिटी म्हणून हजर होता. यावेळी त्याने क्रिकेट करिअर दरम्यानचे अनेक किस्से शेअर केले.
...म्हणून गांगुली राजीनाम्यासाठी तयार झाला
हरभजनने शोएब अख्तरसोबतचे मैदानातील आणि बाहेरचेही किस्से शेअर केलेय यावेळी त्याने गांगुलीसोबत घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला. यावेळी गांगुलीला हरभजनने कसं एप्रिल फूल केलं तो किस्साही शेअर केला.
हरभजन, युवराज सिंह आणि जहिर खान या तिघांनी मिळून एक लेख छापून आणला. ज्यामध्ये हरभजन, युवराज आणि जहिर हे तिघेही खेळ्याच्या बाबतील बिलकुल गंभीर नसून वेगवेगळ्या मुलींसोबत पार्ट्या करतात, असं गांगुलीने मीडियाला दिलेलं स्टेटमेंट छापलं होतं
गांगुलीची थट्टा करण्यासाठी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर देखील सहभागी झाले. हरभजन, युवराज आणि जहिर खेळाबद्दल एवढे गंभीर खेळाडू असाताना त्यांच्याबद्दल अशी प्रतिक्रीया कशी देऊ शकतो, असं सचिन, द्रविड यांनी गांगुलीला सुनावलं. यावर गंभीरपणे उत्तर देताना गांगुलीने सांगितलं की, मी कसलीही प्रतिक्रीया दिलेली नाही, तरीही तुम्हाला वाटत नसेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.
मात्र, हरभजनने एका वृत्तपत्राचं पान गांगुलीला दाखवलं आणि यावर तारिख पाहा असं सांगितलं. तारिख पाहताच गांगुलीच्या लक्षात आलं की, आपल्याला एप्रिल फुल केलं आहे. त्यानंतर गांगुली बॅट घेऊन हरभजनच्या मागे लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement