Grandmaster Chess Tournament: छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूरमध्ये (Raipur) आजपासून (19 सप्टेंबर 2022) आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत आहे.  या स्पर्धेत भारत (India) आणि रशियासह (Russia) 15 देशांतील 500 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.


छत्तीसगड सरकारचे क्रीडा आणि युवक कल्याण विभाग, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (All India Chess Federation) आणि छत्तीसगड ऑलिम्पिक असोसिएशन (Chhattisgarh Olympic Association) यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचं आयोजकांनी शनिवारी सांगितलं. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंना मुख्यमंत्री ट्रॉफी आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. 


या स्पर्धेसाठी 15 देशातील खेळाडूंची नोंदणी
भारतात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी 15 देशांतील खेळाडूंनी नोंदणी केलीय. या देशातं भारत (India), रशिया (Russia), युक्रेन (Ukraine), जॉर्जिया (Georgia), यूएसए (USA), कझाकस्तान (Kazakhstan), मंगोलिया (Mongolia), पोलंड (Poland), व्हिएतनाम (Vietnam), कोलंबिया (Colombia), इराण (Iran), श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि नेपाळचा (Nepal) समावेश आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत 15 देशांतील 500 हून अधिक खेळाडू 100 हून अधिक अनुभवी मास्टर्सच्या मार्गदर्शनाखाली आपलं आव्हान सादर करतील.


विजेत्या खेळाडूंची बक्षीस रक्कम
या स्पर्धेमुळे खेळाडूंना त्यांचं रेटिंग सुधारण्याची आणि जीएम व आईएम नॉर्म प्राप्त करण्याची संधी असेल. मास्टर्स आणि चॅलेंजर्स या दोन गटात स्पर्धा खेळवली जाणार आहे. मास्टर्स गटातील विजेत्या खेळाडूंना 23 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तर, चॅलेंजर्स गटात 12 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेत सहा ग्रँडमास्टर्स, 17 आंतरराष्ट्रीय मास्टर्स, दोन महिला ग्रँडमास्टर्स, आठ महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्स, पाच फिडे मास्टर्स आणि 200 आईएलओ मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. ही एक मोठी उपलब्धी आहे, अशी आयोजन समितीशी संबंधित अधिकाऱ्यानं दिलीय. बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी बजावतील, अशी अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-