एक्स्प्लोर

फ्रान्सला ‘बीस साल बाद’ पुन्हा विश्वचषकाचा मान?

फ्रान्सनं बेल्जियमचा कडवा संघर्ष मोडीत काढून, फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक मारली. फ्रान्सनं याआधी १९९८ आणि २००६ साली विश्वचषकाची फायनल गाठली होती. १९९८ साली फ्रान्सनं ब्राझिलचा धुव्वा उडवून विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं होतं. पण २००६ साली इटालीनं फ्रान्सचं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं ठेवलं. ह्यूगो लॉरिसची फौज यंदा तब्बल वीस वर्षांनी फ्रान्सला पुन्हा विश्वचषक जिंकून देणार का?

मॉस्को : सॅम्युअल उमटिटीच्या हेडरनं फ्रान्सला फायनलचं तिकीट आणि सेलिब्रेशनचीही संधी मिळवून दिली. रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममधून सुरु झालेल्या या सेलिब्रेशनचं लोण थेट पॅरिसच्या शॉज एलिजे या राजपथासह देशाच्या कानाकोपऱ्यात परसलं होतं. तुम्ही म्हणाल की, फ्रान्सनं विश्वचषक जिंकायच्या आधीच एवढं मोठं सेलिब्रेशन करण्याची काय गरज? तर या प्रश्नाला काही अर्थ नाही. कारण ज्या देशात फुटबॉल हा श्वास आहे. आणि तो देश तब्बल बारा वर्षांनी फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारणार असेल, तर सेलिब्रेशनला उधाण हे येणारच. तुम्हाला 2006 सालच्या विश्वचषकाची फायनल आठवते? त्या सामन्यात फ्रान्सच्या झिनेदिन झिदाननं इटालीच्या मार्को मॅटेराझीला जादा वेळेत डोक्यानं ठोकर मारली होती. परिणामी पंचांनी झिदानला रेड कार्ड दाखवलं होतं आणि त्यानंतरच इटालीनं फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. विश्वचषकाच्या फायनलमधल्या त्या पराभवानं फ्रान्सवासियांच्या काळजाला झालेली जखम अजूनही भळभळत आहे. त्यात 2016 साली मायदेशातल्या युरो कपच्या फायनलमध्येही फ्रान्सला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालकडून ०-१ अशी हार स्वीकारावी लागली होती. गेल्या बारा वर्षांमधल्या त्या दोन पराभवांची साऱ्या फ्रान्सला बोच लागून राहिली होती. अखेर ह्यूगो लॉरिसच्या फौजेनं विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म करताच फ्रान्सच्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममधल्या आणि आपल्या देशातल्या सेलिब्रेशनलाही उधाण आलं. फ्रान्सनं आजवरच्या इतिहासात फिफा विश्वचषकावर एकदाच आपलं नाव कोरलं आहे. डिडियर डेशॉच्या नेतृत्त्वाखाली फ्रान्सनं 1998 साली फिफा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये डिडियर डेशॉच्या फ्रान्सनं ब्राझिलचा ३-० असा धुव्वा उडवला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे यंदा फ्रान्सनं पुन्हा विश्वचषकाची फायनल गाठली असताना तेच डिडियर डेशॉ फ्रान्सचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळं डिडियर डेशॉ यांना रशियातल्या फिफा विश्वचषकात अनोख्या विक्रमाची संधी आहे. फ्रान्सनं विश्वचषक जिंकला, तर एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्वचषक जिंकणारे डेशॉ तिसरे फुटबॉलवीर ठरू शकतात. याआधी जर्मनीच्या फ्रान्झ बेकेनबाऊर आणि ब्राझिलच्या मारियो झागलो यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता. बेकेनबाऊर हेही 1974 सालच्या जर्मनीच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर्मनीनं 1990 साली विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मारियो झागलो याचा ब्राझिलच्या 1958 आणि 1962 सालच्या विश्वचषक संघात समावेश होता. त्यानंतर 1970 साली त्यांनी ब्राझिलचे प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकला होता. फ्रान्सच्या डिडियर डेशॉ यांनी यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत विश्वचषक जिंकला, तर त्यांना बेकेनबाऊर आणि झागलो यांच्या पंक्तीत बसण्याची संधी आहे. ह्यूगो लॉरिस, पॉल पोग्बा आणि किलियान एमबापेचा फ्रान्स संघ डेशॉ यांना तो मान मिळवून देऊ शकतो का? लॉरिसच्या फ्रेन्च फौजेचं  सरासरी वय सव्वीस आहे, पण फ्रेन्च आक्रमणाची मदार असलेला किलियान एमबापे अवघा 19 वर्षांचा आहे. डेशॉ यांच्या फ्रान्स संघानं 1998 सालचा फिफा विश्वचषक जिंकला, त्या वेळी एमबापे जन्मालाही आला नव्हता. त्यामुळं फ्रान्सला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची बीस साल बाद मिळालेली संधी ही फ्रान्सच्या कितीतरी पिढ्यांना प्रेरित करणारी आहे. फ्रान्सच्या सेंट पीटर्सबर्गमधल्या बेल्जियमवरच्या विजयानं त्याची सुरुवातही झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget