कोलकाता : टीम इंडियाने या विश्वचषकात (ICC Cricket World Cup 2023) अप्रतिम कामगिरी केली आहे. संघाने लीग टप्प्यापासून आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता टीम इंडियाला एक लीग मॅच खेळून सेमीफायनलसाठी तयारी करायची आहे. 


संपूर्ण विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या संघांचा एकतर्फी पराभव केला आहे. भारतीय क्रिकेटच्या या कामगिरीचे श्रेय कर्णधार रोहित शर्माला जाते, ज्याने आपल्या शैलीने संघाला पुढे नेले. मात्र, एक वेळ अशी आली की रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी नको होती. 






गांगुली यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी कोलकाता टीव्ही चॅनलवर याचा खुलासा केला. ते म्हणाले की,  जेव्हा ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते, त्यांच्या मते विराट कोहलीनंतर रोहित शर्मा संघाची कमान सांभाळणारा सर्वोत्तम खेळाडू होता. या कारणास्तव गांगुली यांनी रोहितला कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली होती.






परंतु, रोहित टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारण्यास तयार नव्हता, कारण तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत असल्याने प्रचंड ताणामुळे रोहितला कर्णधारपदी राहण्यात रस नव्हता, पण सौरभ गांगुली यांनी त्याची मनधरणी केली. 


गांगुली यांनी सांगितले की, "मी त्याला सांगितले की तुला हो म्हणावे लागेल, अन्यथा मी हो म्हणेन." गांगुली रोहितला समजावताना म्हणाले की, बघ, मला माहित आहे की तुझ्यावर ओझं आहे. अनेक सामन्यांमध्ये आणि आयपीएलमध्ये कर्णधारपद, पण तरीही टीम इंडियाच्या कर्णधारपदापेक्षा मोठं काही नाही." 






गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, खूप समजावून सांगितल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचं कर्णधारपद स्वीकारलं आणि आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, 'मला सुरुवातीपासूनच माहीत होते की, विराट कोहलीनंतर सध्या टीम इंडियामध्ये कर्णधारपदापेक्षा चांगला पर्याय नाही. त्यामुळे विश्वचषकात भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहून मला अजिबात आश्चर्य वाटत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या