Asthma in kids : "दमा" (Asthma) हा शब्द ग्रीक शब्द 'अझिन' वरून आला आहे. याचा अर्थ "तोंडातून श्वास घेणे." मुलांमध्ये दम्याची परिस्थिती अशी आहे की, मुलं शाळेत न येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे दमा. भारतातील सुमारे 3.3% मुले बालपणातील ब्रोन्कियल अस्थमाने ग्रस्त आहेत. अशा वेळी मुलांमध्ये दम्याचा त्रास नेमका कसा होतो? हा दमा ओळखायचा कसा? आणि याची लक्षणं कोणती याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


मुलांमध्ये दम्याचा त्रास होतो


अभ्यासानुसार, विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करतात, जे दम्याचे प्रमुख कारण आहे. तसेच, सिगारेटचा धूर हे देखील बालपणातील दम्याचे एक महत्त्वाचे आणि सामान्य कारण आहे. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्यांच्या मुलांना दमा होण्याची शक्यता जास्त असते असंही एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे. पर्यावरणीय प्रदूषण, आनुवंशिक घटक, ऍलर्जीन आणि प्रतिजैविकांचा वापर यांचा परिणाम म्हणून, 1 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दमा अधिक सामान्य होत आहे. काही परिस्थिती, जसे की सर्दी किंवा इतर श्वसन संक्रमण, स्तनपान, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रिफ्लक्स आणि बदल किंवा प्रतिकूल हवामानामुळे देखील लहान मुलांमध्ये दमा होऊ शकतो.


मुलांमध्ये दमा कसा ओळखायचा? 


5 वर्षांखालील मुलांमध्ये दमा ओळखणे कठीण आहे. कारण नवजात आणि लहान मुलांमध्ये दम्याची प्रमुख लक्षणे, जसे की डोकं गरगरणे आणि खोकला इतर आजारांमुळे देखील होतात. याव्यतिरिक्त, 5 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोच्छवासाशी संबंधित निदान चाचण्या अचूक ओळखता येत नाहीत. 


मुलांमध्ये दम्याची लक्षणे


दम्याने ग्रस्त असलेल्या मुलांना अनेकदा खोकला आणि डोकं गरगरतं. छातीत घट्टपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागते अशी काही लक्षणे आहेत. वारंवार ही लक्षणं जाणवत असल्यास किंवा हंगामी बदलांसह श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पालकांनी वेळीच ही लक्षणं ओळखावीत आणि त्वरित मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जावे. 


दम्याचा होमिओपॅथिक उपचार


दम्यावरील होमिओपॅथिक उपचार हे अनुवांशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटक विचारात घेतात आणि केवळ रोगाचे निदान करण्याऐवजी रोगाच्या स्त्रोतावर उपचार करून रोग प्रतिकारशक्ती सक्रिय करण्यासाठी कार्य करतात. होमिओपॅथिक उपचार दम्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात. मात्र, यामुळे कायमचा दमा आजार नष्ट होण्याची शाश्वती देता येत नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Air Pollution : हार्ट पेशंट, फुफ्फुसाचा कर्करोग की ब्रेन स्ट्रोक? प्रदूषणामुळे कोणत्या रूग्णांवर जास्त परिणाम होतात? वाचा सविस्तर