बंगळूर : विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या करा किंवा मरोच्या सामन्यात श्रीलंकेने पाच गडी राखून विजय मिळवून टॉप-4 मध्ये आपला दावा पक्का केला. आता उपांत्य फेरीच्या आणखी एका दावेदारावर दबाव वाढला आहे. पाकिस्तानला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. आता बाबर आझम अँड कंपनीला नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकायचे असेल तर त्यांना इंग्लंडवर 287 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. जे जवळजवळ अशक्य आहे.






पाकिस्तान विश्वचषकातून खरंच बाहेर आहे का?


उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला प्रार्थना करायची होती की, आजच्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवावे, जे होऊ शकले नाही. आता न्यूझीलंडच्या विजयानंतर त्याचे 9 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. जरी दोन्ही संघांनी आपापल्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केले तरी प्रत्येकाचे नऊ सामन्यांमध्ये 10 गुण होतील. परंतु, न्यूझीलंडकडे सर्वोत्तम NRR आहे. या स्थितीत पाकिस्तानला इंग्लंडला 287 धावांनी तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेचा 438 धावांनी पराभव करावा लागेल, जे अशक्य आहे.






सलग चार पराभवानंतर विजय


आजच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम श्रीलंकेला अवघ्या 171 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 23 व्या षटकात पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. सलग चार सामने गमावलेल्या न्यूझीलंडसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता, कारण त्याचे आठ गुण होते आणि भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह उपांत्य फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या साखळी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत हरवायचे होते. या सामन्यात न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्हन कॉनवेने 45 धावा, रचिन रवींद्रने 42 धावा आणि डॅरिल मिशेलने 43 धावा केल्या.




इतर महत्वाच्या बातम्या