Fifa World Cup 2022 Final : फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धेत आज (18 डिसेंबर) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina vs France) हे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 वेळा विश्वचषक जिंकला असून मागील विश्वचषक 2018 चा फ्रान्सने जिंकला असून अर्जेंटिनाने 36 वर्षांपूर्वी अखेरचा विश्वचषक जिंकला होता. त्यात यंदा अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनल मेस्सी (lionel MessI) हा निवृत्ती घेणार असल्याने त्याचा अखेरचा विश्वचषक असेल. त्यामुळे हा विश्वचषक जिंकणं मेस्सीसाठी स्वप्नवत असणार असून त्याचं स्वप्न पूर्ण होणार की फ्रान्स वर्ल्ड कप त्यांच्याकडेच ठेवणार हे पाहावं लागेल...
विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आतापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोनदा अर्जेंटिना आणि एकदा फ्रान्सच्या संघाने बाजी मारली आहे. गेल्या विश्वचषकात हे दोन्ही संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत भिडले होते, ज्यात फ्रान्सने रोमहर्षक लढतीत अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या या महामुकाबल्यात नक्की काय होणार हे पाहावे लागेल...
मेस्सीसाठी विश्वचष अजूनही स्वप्न
लिओनल मेस्सीचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक असावा. गेल्या चार विश्वचषकांमध्ये त्याला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत यावेळी त्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कामगिरी असणार आहे. 2014 मध्येही त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले होते पण त्यानंतर अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
अर्जेंटिनाचा खेळ सुधारता
अर्जेंटिनासाठी विश्वचषकाची सुरुवात खूपच खराब झाली. त्याला पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाविरुद्ध 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यानंतर अर्जेंटिनाने मेक्सिको आणि पोलंडचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि क्रोएशियाला पराभूत करून तिने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. मॅच बाय मॅच, अर्जेंटिनाच्या खेळाडूंमधील खेळ आणखी सुधारला आणि अखेर त्यांनी फायनल गाठली आहे.
फ्रान्सची दमदार कामगिरी कायम
फ्रान्सने 2018 चा विश्वचषक ज्या प्रकारे संपवला, त्याच प्रकारे 2022 चा विश्वचषक सुरू केला. गतविजेता फ्रान्स यावेळीही फेव्हरेट मानला जात आहे. अगदी चॅम्पियनप्रमाणे ते खेळत आहेत. गटात अव्वल स्थानी राहिल्यानंतर या संघाने पोलंड, इंग्लंड आणि मोरोक्को यांना बाद फेरीत पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा-