FIFA Final Argentina vs France : फिफा विश्वचषक 2022 चा (FIFA World Cup 2022) अंतिम सामना अर्जेंटिना (Argentina) आणि फ्रान्स (France) यांच्यात आज 18 डिसेंबर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता (Argentina vs France) सामना सुरु होईल. जगभरातील फुटबॉलप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. कतारमध्ये आज अर्जेंटीना आणि फ्रांसमध्ये मेगा फायनल सामना पाहायला मिळणार आहे. फ्रान्स सध्याचा विश्वविजेता आहे, तर अर्जेंटिनाने अखेरचा विश्वचषक 1968 मध्ये जिंकला होता. या दोन्ही संघांमध्ये रोमांचलक सामना पाहायला मिळणार आहे.
फ्रांस दुसऱ्यांचा विश्वविजेता होणार?
कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवर रविवारी फिफा विश्वचषक स्पर्धेचा 2022 अंतिम सामना रविवारी खेळवला जाईल. यावेळी फ्रान्सचा संघ 2018 चा जगज्जेता आहे. अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. आता फ्रांस सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणारा 60 वर्षांतील पहिला संघ बनण्याच्या अगदी जवळ आहे. एम्बाप्पेच्या फ्रांस संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. पण दुसरीकडे मेस्सीचा अर्जेंटिना संघ त्याला हा विक्रम मोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. जर मेस्सी मैदानावर उतरला तर मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळेल.
मेस्सीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
मेस्सीने अंतिम सामन्यापूर्वी सराव सत्रात भाग घेतला नाही कारण त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. मेस्सी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात मेस्सी खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यानही मेस्सी थोडा अस्वस्थ दिसला, पण त्याने या सामना खेळला. फिफा सुरू होण्याआधीच मेस्सीची तब्येत अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय होता. पण मेस्सीने आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात भाग घेतला आहे आणि त्यापैकी एकाही सामन्यात दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर बसावं लागलेलं नाही.
कोण होणार विश्वविजेता?
विश्वचषक विजेतेपदासाठी फ्रान्स आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जात होते आणि दोघांनीही अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यामागून एक पाऊल दूर आहे, तर अर्जेंटिनाच्या संघाला जगज्जेता होण्याची संधी आहे. दोन्ही संघांमधील सामना चुरशीचा होणार आहे. फ्रान्सचा संघ आणि अर्जेंटिनाचा दोन्ही संघाचा खेळही आक्रमक आहे, त्यामुळे सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.