FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचषकात (FIFA WC 2022) तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि मोरोक्को (Croatia vs Morocco) यांच्यात लढत झाली. या लढतीत क्रोएशियानं मोरक्कोचा 2-1 ने पराभव केला. उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ पराभूत झाले होते. दोन संघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर हा सामना क्रोएशियानं जिंकला आहे.


क्रोएशियाचे (Croatia) विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत क्रोएशियाने मोरोक्कोवर 2-1 ने विजय मिळवला. क्रोएशियानं फिफा विश्वचषक 2022 मधील कांस्यपदकावर नाव कोरले. क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचचा (Luka Modric) हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता. कारण त्याने निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या विश्वचषकात क्रोएशिया उपविजेता ठरला होता. यावेळी त्याला उपांत्य फेरीत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाकडून 3-0 पराभव पत्करावा लागला. 


मोरोक्कोचा संघ चौथ्या क्रमांकावर


दुसरीकडं, मोरोक्कचा (Morocco)  संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ होता. उपांत्य फेरीत मोरोक्कोला फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. आता तिसऱ्या स्थानसाठी झालेल्या सामन्यात क्रोएशियाकडून मोरोक्कोचा पराभव झाला आहे. या विश्वचषकात मोरोक्कोचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. क्रोएशियाने आपला आक्रमक खेळ दाखवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. क्रोएशियाच्या संघानं सामन्याच्या पूर्वार्धात दोन गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. क्रोएशियाच्या मिस्लाव ओरसिकने 42 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला मोरोक्कोवर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 


सातव्या मिनीटाला क्रोएशियाचा पहिला गोल 


सातव्या मिनिटाला गार्डिओलने क्रोएशियासाठी पहिला गोल केला. यानंतर नवव्या मिनिटाला मोरोक्कोच्या अश्रफ दारीने गोल करुन स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला होता. त्यानंतर 42 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या ऑर्किचने गोल करत आपल्या संघाला 2-1 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या स्थानाच्या लढतीत क्रोएशियाने मोरोक्कोवर 2-१ ने मात केली. सामन्यातील तीनही गोल पूर्वार्धात झाले. उत्तरार्धात एकाही संघाला गोल करता आला नाही. दरम्यान, आज फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा फायनलचा सामना होणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी लढत आज होणार आहे. हा सामना जिंकून विश्वचषकावर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Fifa World Cup 2022 : फ्रान्सची फायनलमध्ये धडक, मोरोक्कोचं स्वप्न भंगले, अर्जेंटिनासोबत होणार अंतिम सामना