FIFA WC 2022: फुटबॉल विश्वचषकात गुरूवारी जपाननं बलाढ्य स्पेनचा (Japan vs Spain) 2-1 नं पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान मिळवलं. जपानच्या रोमहर्षक विजयामुळं जर्मनीचं (Germany) या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आलं. हा फुटबॉल विश्वचषकातील मोठा उलटफेर मानला जातोय. फुटबॉल विश्वचषकाच्या राऊंड ऑफ 16 चं तिकिट मिळवण्यासाठी ग्रुप 'ई'च्या गटात जपान, स्पेन, जर्मनी, कोस्टा रिका या चा संघात स्पर्धा रंगली होती. प्रत्येक गटातून दोन संघ राऊंड ऑफ 16 साठी पात्र ठरणार होते. ग्रुप 'ई' मधून जपान आणि स्पेननं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केलाय. तर, जर्मनी आणि कोस्टा रिकाच्या संघाला आपलं सामान गुंडळावं लागलंय.
ट्वीट-
ट्वीट-
जपानचं जोरदार कमबॅक
या सामन्यात स्पेननं सुरुवातीपासून जपानवर दबाव कायम ठेवला. या सामन्यातील 11 व्या मिनिटाला स्पेनच्या अल्वारो मोराटानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतरही स्पेननं त्यांचा आक्रमक खेळ सुरुच ठेवला. स्पेननं एकूण 14 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या सामन्यात स्पेननं 78 टक्के बॉल त्यांच्याजवळ ठेवला. मात्र, असं असतानाही स्पॅनिश फॉरवर्डला दुसरा गोल करता आला नाही. दुसरीकडं फक्त 14 टक्के बॉल आपल्या जवळ ठेवलेल्या जपानच्या संघानं सहा वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. यातील त्यांचे दोन प्रयत्न यशस्वी ठरले. जपानकडून रित्सू डॉननं 48व्या मिनिटाला आणि ओ तनाकानं 51व्या मिनिटाला गोल केले.
जर्मनीचं आव्हान संपुष्टात
ग्रुप-ई मध्ये जपान विरुद्ध स्पेन तसेच जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका सामनाही खेळला जात होता. स्पेननं सुरुवातीला जपानविरुद्ध जर्मनीने कोस्टा रिकावर आघाडी घेतली. ज्यामुळं स्पेन आणि जर्मनी पुढी फेरीसाठी पात्र ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली. पण दुसऱ्या हाफमध्ये जपाननं स्पेनविरुद्ध आघाडी घेतली. ज्यामुळं स्पेनसह जपानचं पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता वाढली. अखेरच जपाननं स्पेनचं पराभव करत जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं.
हे देखील वाचा-