India vs Bangladesh ODI Series: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चार डिसेंबरपासून एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झालाय. रोहित शर्मासह विराट कोहली आणि इतर खेळाडूंचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. बांगलादेशमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांकडून या फोटोला पसंती मिळत आहे.
गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. मुंबई विमानतळावरुन भारतीय संघ रवाना झाला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडूंचं बांगलादेश विमानतळावर पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना पुष्पगुच्छल देण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह टीम इंडिया विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोहचली आहे. भारतीय संघातील खेळाडू लवकरच सरावाला सुरुवात करतील. चार डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांच्या महितीनुसार कर्मधार तमीम इकबाल दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन
भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ :
तमीम इकबाल (कर्णधार), लिटन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, इबादत हुसैन, नसुम अहमद, महमूद उल्लाह, नजमुल हुसैन शान्तो आणि काजी नूरुल हसन सोहन.
कोणत्या मैदानावर होणार सामने?
बांगलादेश आणि भारत यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ढाकामधील मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियम (एसबीएनसीएस) मध्ये होणार आहे. तीसरा वनडे सामना चटगांवमधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |