Ghana vs Korea Republic Match Report: फिफा विश्वचषकात काल (सोमवारी) घाना आणि दक्षिण कोरियाचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात घानानं दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव केला. मात्र, दक्षिण कोरियाविरुद्धच्या विजयानंतर घानानं राउंड ऑफ-16 मध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाविरुद्ध घानाच्या विजयाकडे एक उलटफेरा म्हणून पाहिलं जात आहे. कारण फिफा रँकिंगवर नजर टाकली, तर दक्षिण कोरियाचं फिफा रँकिंग 28 आहे, तर घाना 61व्या स्थानावर आहे. 


घानाच्या मोहम्मद कुडूसनं डागला सामन्यातील पहिला गोल


दक्षिण कोरियाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत होता. मात्र घानानं उत्तम पद्धतीनं डिफेंड करत दक्षिण कोरियाला गोल डागण्याची एकही संधी दिली नाही. अशातच 24व्या मिनिटाला संधी साधत घानाच्या मोहम्मद सलिसूनं एक गोल डागत संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ 34व्या मिनिटाला मोहम्मद कुदुसनं गोल डागला. त्यानंतर सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत असलेल्या दक्षिण कोरियानं तीन मिनिटांत दोन गोल डागत सामन्या बरोबरीत आणला. दक्षिण कोरियानं 58व्या आणि 61व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियाचे दोन्ही गोल चो ग्युसांगनं हेडरवर केले. त्यापाठोपाठ घानानं आणखी एक गोल डागत विजयाला गवसणी घातली. 


घानाच्या फुटबॉल संघाचा स्टार्टिंग लाईनअप : 


लॉरेंस अति जीगी, तारिक लॅम्पटे, मोहम्मद सालिसू, गिदोन मेंसा, डेनियल अमार्टे, थॉमस पार्टे, कुडुस मोहम्मद, सालिस अब्दुल समेद, जॉर्डन अयू, आंद्रे अयू, इनाकी विलियम्स


दक्षिण कोरिया फुटबॉल संघाचा स्टार्टिंग लाईनअप : 


किम स्यूंगयू, किम जिनसु, किम मिंजे, किम मूनह्वान, किम यंगवॉन, जंग वूयंग, ह्वांग इनबॉम, सोन ह्यूंगमिन, क्वोन चंघून, जेओंग वूयॉन्ग, चो ग्यूसुंग 


फिफा वर्ल्ड कप 2022 चं फॉर्मेट


ग्रुप स्टेजमध्ये, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये 16 पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल.


फिफा विश्वचषक 2022 चे सामने कुठे पाहाल? 


भारतात FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Cameroon vs Serbia: कॅमेरून विरुद्ध सर्बियाचा रंगतदार सामना; अटीतटीची लढत, सामना 3-3 अशा बरोबरीत सुटला