FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात (Fifa World Cup 2022) अगदी अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा 12.30 वाजता (3 डिसेंबर) झालेल्या ब्राझील विरुद्ध कॅमेरुन (Brazil vs Cameron) सामन्यात कॅमेरुनंन रोमहर्षक असा 1-0 च्या फरकाने विजय मिळला. विशेष म्हणजे कॅमेरुनचा कॅप्टन विन्सेंट अबुबकर (Vincent Aboubakar) याने एक्स्ट्रा टाईममध्ये (90+1) केलेल्या गोलमुळेच त्यांचा विजय झाला.


ज्यानंतर त्यानं डॅशिंग असं टी-शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन चांगलच व्हायरल झालं. पण या त्याच्या कृतीमुळे रेफरीने त्याला यलो कार्ड दिलं सामन्यातील त्याचं हे दुसरं यलो कार्ड असल्याने त्याचं रेड कार्डमध्ये रुपांतर झालं आणि त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. पण यावेळी रेफरीनेही विन्सेंट याचं कौतुक करत नियम म्हणून त्याला यलो कार्ड दिलं, ज्यानंतर सामनाही काही वेळातंच संपला आणि कॅमेरुनच्या बाजूने निर्णय़ लागला ज्यामुळे विश्वचषकात ब्राझीलला मात देणारी कॅमेरुन पहिली आफ्रिकन टीम बनली.






राऊंड ऑफ 16 मध्ये पोहचू शकला नाही कॅमेरुन


या ऐतिहासिक विजयानंतरही कॅमेरूनचा संघ अंतिम 16 अर्थात राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचू शकला नाही. कॅमेरूनचा संघ जी गटात होता. या गटात ब्राझील, स्वित्झर्लंड आणि सर्बिया हे इतर संघ होते. कॅमेरूनने त्यांच्या तीनपैकी एक सामना जिंकला आणि त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला. अशा प्रकारे त्यांना तीन गुणच मिळाले. तर ब्राझील आणि स्वित्झर्लंडने त्यांच्या तीन सामन्यांपैकी 2-2 जिंकले आणि पुढील फेरी गाठण्यात यश मिळविलं. त्याचवेळी सर्बियाने तीनपैकी दोन सामने गमावले आणि त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ते देखील स्पर्धेबाहेर गेले.


हे देखील वाचा-