FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात शुक्रवारी दक्षिण कोरिया आणि पोर्तुगालचा संघ (South Korea vs Portugal) आमने-सामने आले होते. ग्रुप एफमधील सामन्यात दक्षिण कोरियानं पोर्तुगालचा 2-1 नं पराभव केला. दक्षिण कोरियाकडून पोर्तुगालचा पराभव हा फुटबॉल विश्वचषकातील मोठा उलटफेर मानला जातोय. या विजयानंतर दक्षिण कोरियाचे चार गुण झाले आहेत. तर, पोर्तुगालचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पोर्तुगालनं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत.
दक्षिण कोरियाविरुद्ध पोर्तुगालनं दमदार सुरुवात केली. पोर्तुगालच्या संघानं सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच पहिला करत 1-0 अशी आघाडी घेतली. रिकार्डो होर्टानं पोर्तुगालसाठी हा गोल केला. रिकार्डो होर्टानं 2014 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या सामन्यानंतर या खेळाडूला दक्षिण कोरियाविरुद्ध संधी मिळाली. त्यानं या संधीचं सोन करून दाखवलं. यानंतर दक्षिण कोरियानं शानदार पुनरागमन करत 27व्या मिनिटाला पहिला गोल केला. दक्षिण कोरियासाठी किम युंग ग्वॉननं हा गोल केला. त्याचवेळी कोरियन संघानं निर्धारित 90 मिनिटांनंतर इंज्युरी टाइममध्ये आघाडी घेतली. अशाप्रकारे दक्षिण कोरियानं हा सामना 2-1 असा जिंकला.
ट्वीट-
ट्वीट-
संघ-
दक्षिण कोरियाची स्टार्टिंग इलेव्हन
किम सेउंग ग्यु (गोलकीपर) किम जिन सु, किम यंग ग्वॉन, क्वोन क्यूंग वोन, किम मून ह्वान;, जंग वू यंग, ह्वांग इन बीओम, ली कांग इन, ली जे सुंग, सोन ह्युंग मिन (कर्णधार), चो ग्यु सुंग
पोर्तुगालची स्टार्टिंग इलेव्हन
दिएगो कोस्टा (गोलकीपर) डिएगो डालोट, अँटोनियो सिल्वा, पेपे, जोआओ कॉन्सुएलो, रुबेन नेवेस, मॅथ्यूस न्युनेस, रिकार्डो होर्टा, जोआओ रिओ, विटिन्हा, क्रिस्टियानो रोनाल्डो (कर्णधार)
हे देखील वाचा-