Quarter Final, Croatia vs Brazil : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) ग्रुप स्टेज त्यानंतर राऊंड ऑफ 16 चे सामने संपून आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया (Brazil vs Croatia) यांच्यात असणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये पोहोचणार असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की!
दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार केला तर ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्यांमध्ये ब्राझीलनं एकहाती पकड आजवर बनवून ठेवली आहे. एकूण दोन्ही संघात पार पडलेल्या 4 सामन्यांतील 3 सामने ब्राझीलने जिंकले असून 1 सामना अनिर्णीत सुटला आहे. क्रोएशियाने आजवर एकही सामना ब्राझीलविरुद्ध जिंकला नसल्याने आजचा सामना जिंकून विजयी सलामीसह सेमीफायनलमध्ये क्रोएशिया एन्ट्री मारतो का ब्राझील आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो हे पाहावे लागेल.
कधी, कुठे पाहाल सामना?
ब्राझील विरुद्ध क्रोएशिया हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता रंगणार आहे. कतारच्या एज्युकेशन सिटी स्टेडियम याठिकाणी सामना खेळवला जाणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना | ब्राझील विरुद्ध क्रोएशिया | 09 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना | पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को | 10 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल-थुमामा स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना | अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स | 11 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना | इंग्लंड विरुद्ध फ्रान्स | 12 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | अल बायत स्टेडियम |
हे देखील वाचा-