Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) सुरु असतानाच ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar JR.) पायाच्या दुखापतीमुळे काही सामने विश्रांतीवर होता. पण आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर ब्राझीलच्या दक्षिण कोरियाविरुद्धच्या विश्वचषकाची बाद फेरीच्या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे. सर्बियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो सरावासाठी आला नव्हता. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. आता 6 डिसेंबरला ब्राझीलचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. त्यापूर्वी नेमारने ट्रेनिंग सुरु केली आहे.
ब्राझीलच्या या स्टार फुटबॉलपटूने ट्वीट करून सराव सुरु केल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने, 'मला आता बरं वाटत आहे.' असं लिहित काही फोटोही शेअर केले आहेत. शुक्रवारच्या सामन्यात न खेळलेल्या संघातील काही खेळाडूंसोबत नेमार सराव करताना दिसून आला. ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये नेमार चांगल्या प्रकारे दोन्ही पायांनी सराव करताना दिसत आहे, विशेष म्हणजे त्याच्या पायावर जखमेच्या कोणत्याही खुणा नसल्याने फॅन्सही आनंदी आहेत.. मात्र, ब्राझीलच्या मेडीकल टिमने नेमारच्या प्रकृतीबाबत तात्काळ अपडेट दिलेला नाही. त्यामुळे दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कधी, कुठे पाहाल सामना?
ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया हा बाद फेरीचा सामना आज मध्यरात्री उशिरा स्टेडियम 974 याठिकाणी रंगणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
Round of 16: Match- 5 | जपान विरुद्ध क्रोएशिया | 05 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल जनुब स्टेडियम |
Round of 16: Match- 6 | ब्राझील विरुद्ध कोरिया | 06 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | स्टेडियम 974 |
Round of 16: Match- 7 | स्पेन विरुद्ध मोरोक्को | 06 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
Round of 16: Match- 8 | पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड | 07 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
हे देखील वाचा-