Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?
Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली.
Stadium 974 dismantled : कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाची (FIFA World Cup 2022) सांगता झाली. अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून इतिहास रचला. अर्जेंटिनाच्या संघानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. दरम्यान, विश्वचषक यंदा एका आशियाई देशात आयोजित करण्यात आला होता, त्यामुळं आयोजन नेमकं कसं होईल? याबाबत प्रश्न निर्माण होत होते. पण कतारनं अप्रतिमपणे 2022 फिफा विश्वचषकाचं आयोजन केलं. या स्पर्धेसाठी आठ स्टेडियम ही कतारमध्ये तयार केले होते.यातील काही नवीन बांधण्यात आले, तर काही जुने स्टेडियम दुरुस्त करण्यात आले. दरम्यान यातील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं स्टेडियम 974 आता अस्तित्वात राहणार नाही. फुटबॉल विश्वचषकातील सामने खेळण्यासाठी हे स्टेडियम उभारण्यात आलं होतं. कतारच्या उन्हातही खेळाडू आणि प्रेक्षकांना गर्मी होणार नाही, अशा तंत्रज्ञानानं हे स्टेडियम बांधण्यात आलं होतं, पण आता हे स्टेडियम जमिनदोस्त होणार आहे.
फुटबॉल विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या आठ स्टेडियमपैकी स्टेडियम 974 नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फुटबॉलविश्वचषकानंतर हे स्टेडियम हटवण्यात येईल, अशा उद्देशानं या स्टेडियमचं निर्माण केलं गेलं होतं. हे संपूर्ण स्टेडियम 974 शिपिंग कंटेनरनं बनवण्यात आलं होतं. कंटेनरच्या संख्येवरून स्टेडियमचं नाव देण्यात आलं आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे कतारचा डायलिंग कोड देखील 974 आहे. या स्टेडियममागील कल्पना फेनविक इरिब्रेन आर्किटेक्ट्स यांनी श्लेच बर्गरमन पार्टनर्स आणि हिल्सन मोरान यांची आहे.
4000 प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम
हे स्टेडियम इंट्रेस्टिंग इंजिनिअरिंगच्या सीरीजमध्ये 15व्या क्रमांकावर आहे. हे वर्ष 2022 आधारित नावीन्यपूर्ण असल्याचं मानलं जातं. यामध्ये आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, युनिक सोलर पॅनल आणि नवीन थ्रीडी प्रिंटिंग पद्धतीसह अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हे स्टेडियम स्टील फ्रेमच्या आधारे शिपिंग कंटेनरचे ब्लॉक्स तयार करून तयार करण्यात आले आहे. 40,000 प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम आता तोडले जाणार आहे.
स्टेडियम 974चं निर्माण
स्टेडियम 974चं निर्माण करणं इंजिनिअरसाठी आव्हानात्मक होतं. हे स्टेडियमवर यशस्वीरित्या उभ करण्यासाठी अनेक अनुभवी इंजिनिअर आणि तसेच अनुभवी वास्तुविशारदांची गरज भासली. फुटबॉल विश्वचषकातील इतिहासातील हे पहिले स्टँड-अलोन स्टेडियम होतं, जे आता पाडलं जाणार आहे.
हे देखील वाचा-