एक्स्प्लोर
भारत आणि इंग्लंडमध्ये फायनल व्हावी, असंच सर्वांना वाटतं: विराट कोहली
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्याचं आव्हान पार करत टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारत हा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करेल अशी सर्वांनाच आशा आहे. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे तर पाकिस्तानचा इंग्लंडशी भिडणारआहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कोच अनिल कुंबळे हे काल (सोमवार) लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावरील एका आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कोहली म्हणाला की, 'सेमीफायनलमध्ये आम्ही कोणाशी खेळतोय याने फार काही फरक पडत नाही. कारण की, साखळी सामन्यांचं आव्हान सर्वात कठीण होतं. आता आम्ही फायनलपासून फक्त एक पाऊल दूर आहोत. त्यामुळे प्रत्येकाला असंच वाटतं आहे की, फायनल भारत आणि इंग्लंडमध्ये व्हावी. भारताच्या प्रत्येक सामन्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. हे पाहून खरंच बरं वाटलं.' असंही कोहली म्हणाला.
'पावसानं जर अडथळा आणला नाही तर क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंड एक चांगली जागा आहे. इथं चेंडू नेहमीप्रमाणे स्विंग होत नाही. पण ढगाळ वातावरणात खेळणं कठीण होतं. त्यामुळे एक फलंदाज म्हणून तुम्हाला इथं अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.' असं कोहली म्हणाला.
त्यामुळे आता फायनलमध्ये नेमकं कोण धडक मारणार हे पुढच्या दोनच दिवसात स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या:
...तर बांगलादेशविरुद्ध न खेळताही टीम इंडिया फायनलमध्ये!
वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच टीम इंडियाचा कोच : BCCI
चॅम्पियन्स ट्रॉफीतून श्रीलंका बाहेर, पाकिस्तान सेमीफायनलमध्ये
पाकिस्तान की इंग्लंड, फायनलमध्ये कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement