एक्स्प्लोर

विशाखापट्टणम कसोटी, भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज

विशाखापट्टणम : इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कूक आणि हसीब हमीदच्या झुंजार फलंदाजीने विशाखापट्टणम कसोटीत भारतीय फिरकी गोलंदाजांच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा पाहिली. पण अखेर अश्विनने हमीदला आणि रवींद्र जाडेजाने कूकला पायचीत करुन चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची दोन बाद 87 अशी बिकट अवस्था केली आहे. या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 405 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं असून, इंग्लंडला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 318 धावा कराव्या लागणार आहेत. विराट कोहलीच्या टीम इंडियाला ही कसोटी जिंकायची, तर अजूनही आठ विकेट्स घेण्याचं आव्हान आहे. दरम्यान, अॅलेस्टर कूक आणि हसीब हमीद या सलामीच्या जोडीने दुसऱ्या डावातही जबाबदारीने फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचून भारतीय फिरकी गोलंदाजांना यशासाठी संघर्ष करायला लावला. अश्विनने हमीदला 25 धावांवर पायचीत केलं. पण कूकने अर्धशतक झळकावलं. त्याने चार चौकारांसह 54 धावांची खेळी उभारली. अखेर जाडेजाने इंग्लंडच्या कर्णधाराला माघारी धाडलं. जयंत आणि शमीच्या भागीदारीने भारताला सावरलं इंग्लंडच्या इनिंग अगोदर जयंत यादव आणि मोहम्मद शमीने अखेरच्या विकेटसाठी केलेल्या 38 धावांच्या धडाकेबाज भागीदारीने विशाखापट्टणम कसोटीत भारताला दुसऱ्या डावात 204 धावांची मजल मारून दिली. टीम इंडियाने पहिल्या डावात घेतलेल्या 200 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर विजयासाठी  405 धावांचं कठीण आव्हान उभं राहिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आदल्या दिवशीच्या 3 बाद 98 धावांवरून आज सकाळी भारताचा दुसरा डाव पुढे सुरू केला. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारताचा दुसरा डाव  नऊ बाद 166 असा कोसळला होता. त्या परिस्थितीत जयंत आणि शमीनं केलेल्या भागिदारीनं भारताला सावरलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget