एक्स्प्लोर
वन डे क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, इंग्लंड अव्वल स्थानी
आयसीसीच्या सुधारित वन डे क्रमवारीत टीम इंडियाला आपलं अव्वल स्थान गमावावं लागंल आहे.

मुंबई : आयसीसीच्या सुधारित वन डे क्रमवारीत टीम इंडियाला आपलं अव्वल स्थान गमावावं लागंल आहे. मागील अनेक दिवसांपासून वन डेमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडने अव्वल स्थानी झेप घेतली असल्याने भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकवर समाधान मानावं लागणार आहे.
125 गुणांसह इंग्लंडने पहिलं स्थान पटकावलं आहे, तर 122 गुणांसह भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
इंग्लंडने शानदार कामगिरी करत मागील सहाही मालिकेत विजय संपादन केला आहे. एवढंच नव्हे तर मॉर्गनच्या नेतृत्त्वात खेळताना इंग्लंडने 10 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे.
नव्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला आहे. 104 पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पाकिस्ताला सहा गुणांचा फायदा झाला आहे.
संबंधित बातम्या :
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचं अव्वल स्थान आणखी मजबूत
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















