एक्स्प्लोर
इंग्लंड-बांगलादेशच्या लढतीने ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजणार
लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश संघांत लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर उद्या होत असलेल्या सामन्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीची सलामी दिली जाईल.
या सामन्यासाठी प्रेक्षकांना वेळेत स्टेडियममध्ये येण्याचा इशारा देण्यात येत आहे. तुम्ही थोडासा उशीर केलात तरी सामन्यातल्या निर्णायक क्षणांना मुकाल याची त्यांना जाणीव करून देण्यात आली आहे.
या इशाऱ्याचं कारण आहे इंग्लंडमधलं सध्याचं कुंद आणि ढगाळ वातावरण. या वातावरण चेंडू अधिक स्विंग होतो. त्यामुळं फलंदाजी करणाऱ्या संघाची घसरगुंडी उडते.
सोमवारी लंडनच्या लॉर्डसवर तेच घडलं. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबादा आणि वेन पार्नेलनं यजमान इंग्लंडची पाच षटकांत सहा बाद 20 अशी दाणादाण उडवली होती.
भारतीय गोलंदाजांनी तर मंगळवारी बांगलादेशचा अवघ्या 84 धावांत खुर्दा उडवला आणि 240 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या दोन सामन्यांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या संघांनी इंग्लंडमधल्या वातावरणाचा चांगलाच धसका घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement