एक्स्प्लोर

बिझी शेड्यूलमुळे स्टुअर्ट ब्रॉडचं ब्रेकअप

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतील असमाधानकारक प्रदर्शनानंतर मैदानाच्या बाहेरुनही त्याच्यासाठी वाईट बातमी आहे. ब्रॉडची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध गायक मॉली किंगने स्टुअर्टसोबतचं नातं संपवलं आहे.

लंडन : टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला फार कमाल दाखवता आली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतील असमाधानकारक प्रदर्शनानंतर मैदानाच्या बाहेरुनही त्याच्यासाठी वाईट बातमी आहे. ब्रॉडची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध गायक मॉली किंगने स्टुअर्टसोबतचं नातं संपवलं आहे. काही वृत्तांनुसार, या 30 वर्षीय सेलिब्रिटीने सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, तर दोघांनी सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ब्रिटिश टॅबलॉईडच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मॉली आणि स्टुअर्ट यांच्यातला रोमान्स आता संपला आहे. दोघांचंही वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणंही कठीण झालं आहे. त्यामुळे मॉली आणि स्टुअर्टने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या रिलेशनशीपपूर्वी मॉली स्टुअर्टची फक्त मैत्रीण होती. सुरुवातीला दोघे काही डेट्सवर गेले, ते दिवस अत्यंत चांगले होते, असं मॉली म्हणाली होती. स्टुअर्ट अत्यंत प्रेमळ माणूस आहे. आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही कशा प्रकारे एकमेकांना भेटलो, हे माहित नाही. मात्र खुप सहजपणे त्याच्या प्रेमात पडले, असंही मॉली काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. बिझी शेड्यूलमुळे स्टुअर्ट ब्रॉडचं ब्रेकअप सोबतच मॉलीने स्वतःबाबत सांगितलं होतं, की ''मी करिअर आणि प्रेमाचे निर्णय डोक्यापेक्षा मनाचा आधार घेऊन घेतले आहेत, जे कधी कधी चांगलं नसतं,'' असं म्हणत तिने काही निर्णय चुकत असतात, असे संकेत दिले होते. स्टुअर्ट ब्रॉडला भेटण्यापूर्वी मॉली मॉडल डेव्हिड गँडीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तर मॉलीला भेटण्यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉड मॉडल बिली मिचेलसोबत रिलेशनशीपमध्ये होता. युवराज सिंहने 2007 च्या विश्वचषकात ज्याच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार ठोकले होते, तो गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच होता. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात कायम असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2027: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Embed widget