Drug  Smuggling Case: अमेरिकेची स्टार महिला बास्केटबॉलपटू ब्रिटनी ग्रिनरनं (Brittany Griner) ड्रग्ज बाळगल्याचा आणि त्याची तस्करी केल्याच्या आरोपाची कबुली दिली. रशियात एका न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनीनं गुरुवारी पार पडलेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला. सुनावणीदरम्यान ब्रिटनं म्हणाली की, हे माझ्याकडून नकळत आणि गडबडीत सामान पॅक करताना घडलं. या सामन्यात ड्रग्ज आल्याची कल्पना तिला नव्हती, असंही तिनं म्हटलंय. 


ब्रिटनी ग्रिनरच्या सामनात गांजाचं तेल आढळलं
मॉस्कोमधील शेरेमेत्येवो विमानतळावर ब्रिटनी ग्रिनरच्या समानात गांजाचं तेल सापडलं होतं. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, गुरुवारी याप्रकरणाच्या सुनावणीला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली. ब्रिटनी गुरुवारी एका रशियन न्यायालयात ड्रग्जच्या आरोपांच्या सुनावणीसाठी दाखल झाली. त्यावेळी अमेरिका या प्रकरणात हस्पक्षेप करत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, यामुळं ब्रिटनीला सुटकेची संधी मिळणार नाही, असा इशाराही रशियन न्यायालयानं दिलाय. 


ब्रिटनी अमेरिकेची स्टार बास्केटबॉलपटू
ब्रिटनी ग्रिनर हे महिला राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनमधील फिनिक्स मर्क्युरीसाठी सात वेळीची ऑल-स्टार सेंटर ठरली आहे. ब्रिटनी, 6 फूट 9 इंच उंच यूएस कॉलेज इतिहासात 2,000 गुण मिळवणारी आणि 500 ​​शॉट्स ब्लॉक करणारी एकमेव महिला आहे. ब्रिटनीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, या खेळाडूला मुक्त करण्यासाठी वॉशिंग्टनला अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं जात आहे. ब्रिटनी ग्रिनर ही गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तुरूंगात आहे. 


हे देखील वाचा-