Team India : भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies) एकदिवसीय आणि टी20 सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून एकदिवसीय सामन्यांसाठीचा भारतीय संघही जाहीर झाला आहे. यावेळी शिखर धवनला कर्णधारपद सोपवण्यात आलं असून दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान टी20 मालिकेत मात्र हे दिग्गज रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली हे दिग्गज खेळण्याची शक्यता आहे. एएनआय वृत्तसंस्थेला बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीतून हे समोर आले आहे.
यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ तयार करण्याच्या दृष्टीने बीसीसीआय नवनवीन खेळाडूंना संधी देत असून नेमके कोणते खेळाडू खेळणार हे खेळाडूंच्या खेळीवरुनच स्पष्ट होईल. दरम्यान त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय संघात दिग्गज खेळाडू नसले तरी टी20 मालिकेत मात्र दिग्गजांना संधी दिली जाऊ शकते.
कसं आहे सामन्यांचं वेळापत्रक?
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
हे देखील वाचा-
- Kamran Akmal: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलच्या घरातून बकऱ्याची चोरी!
- Jos Buttler vs Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार पुन्हा जोस बटलरवर पडला भारी!
- Hardik Pandya: गोलंदाजांना घुतलं, त्यानंतर फलंदाजांनाही रोखलं; हार्दिक पांड्याचा 'वन मॅन शो'!