ENG vs IND : सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of England) असून सध्या टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या टी20 (India vs England 2nd T20) मध्ये भारत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेईल? की इंग्लंड (England) सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधतो...याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आलातर सामनाच अनिर्णीत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामना होणाऱ्या मैदानात उद्या अर्थात 9 जुलै रोजी हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊया...


भारत आणि इंग्लंड यांच्यीतल दुसरा टी20 सामना इंग्लंडच्या बर्मिंगहमधील एजबेस्टन (Edgbaston) मैदानात खेळवला जात आहे. दरम्यान बर्मिंगहममध्ये (Birmingham) 9 जुलै रोजी कमाल तापमान 21 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान  11 डिग्री सेल्सियस असू शकतं. तसंच शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचीही शक्यता आहे. याशिवाय वेगाचा वारा वाहू शकत असल्याने गोलंदाजांना अधिक फायदा देखील होऊ शकतो. 44 टक्के ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे पावसाच्या अत्यंत कमी पण शक्यता नक्कीच आहे. 


दुसऱ्या टी20 साठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक


हे देखील वाचा-