एक्स्प्लोर

DC vs RR IPL 2021 Match Preview: आज मुंबईत राजस्थान विरुद्ध दिल्ली भिडणार, युवा यष्टीरक्षक कर्णधारांमधील लढाई

DC vs RR IPL 2021 Match Preview:आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमध्ये वानखेडेवर ही रंगतदार लढत असणार आहे.

DC vs RR IPL 2021 Match Preview: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमध्ये वानखेडेवर ही रंगतदार लढत असणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या दोघांकडेही आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व आलं आहे.  त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे. 

दिल्लीने पहिल्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करत अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला हरवलं आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मात्र पंजाब विरुद्ध निसटता पराभव झाला. मात्र या सामन्यात संजू सॅमसनच्या आक्रमक शतकी खेळीमुळं राजस्थानचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे.  

IPL 2021 : बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या अडचणींमध्ये वाढ; कारवाई होणार?

राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात फटका बसला होता. त्यानंतर आता ऑलराऊंडर बेन स्टोक्स देखील दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे डेविड मिलर किंवा लियम लिविंगस्टोनला संधी मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनसह, मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबेकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

दुसरीकडे दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दिल्ली संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दिल्लीकडून सलामीवीक शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जबरदस्त फार्मात आहेत. सोबतच  ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर यांच्या खेळीकडे देखील लक्ष असणार आहे. 

असे असतील संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, टॉम करन, अमित मिश्रा

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget