CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू (Indian Athletes) सातत्यानं दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा स्टार भालेफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) ट्विटरच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलंय. कॉमनवेल्थ लॉन्ग जंप स्पर्धेत भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या तेजस्वीन शंकरसोबत (Tejaswin shankar) त्यानं एक फोटो ट्वीट करत भारताच्या खात्यात आणखी काही पदक जमा होणार आहेत, असा विश्वासही व्यक्त करून दाखवलाय. 


नीरज चोप्रा काय म्हणाला?
"बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आमचे भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलंय. भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांचे आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. आमचे सर्व वेटलिफ्टरनं चांगली कामगिरी केली. मीराबाई, जेरेमी, अचिंता, संकेत, बिंदियारानी, ​​विकास, गुरुराजा, लवप्रीत, हरजिंदर आणि गुरदीप यांचं देशासाठी पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन."


ट्वीट-



ट्वीट- 



ट्वीट-



तसेच नीरज चोप्रानं भारताचा पुरुष टेबल टेनिस संघ आणि महिला लॉन बॉल्स संघाचं सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. यासोबतच त्यांनं बॅडमिंटन मिश्र सांघिक, ज्युदो खेळाडू आणि स्क्वॉशपटूंनी मिळवलेलं पदकं देशाची शान असल्याचं म्हटलंय. गोल्ड कास्ट 2018 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा एक फोटोही त्याने तेजस्वीन शंकरसोबत शेअर केलाय. 


हे देखील वाचा-