Noah Dastagir Butt On Mirabai Chanu: बर्मिंगमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) 22 वा हंगाम खेळला जात सुरू असून आज या स्पर्धेचा सातवा दिवस आहे. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी पाकिस्तानचा वेटलिफ्टिरन नूह दस्तगिर बटनं (Noah Dastagir Butt) त्यांच्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. महत्वाचं म्हणजे, सुवर्णपदक जिंकल्यानंतर नूह दस्तगिर बटनं मीराबाई (Mirabai Chanu) चानू माझी प्रेरणास्त्रोत असल्याचं म्हटलंय. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये घवघवीश यश संपादन करत संपूर्ण जगावर छाप सोडलीय. मीराबाई चानूचे केवळ भारतातच नाही तर, इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. हे नूह दस्तगिर बटच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होतंय.


नूह दस्तगिर बट काय म्हणाला?
बर्मिंगमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात पाकिस्तानच्या नूह दस्तगिर बटनं चांगली कामगिरी करत देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलंय. त्यावेळी  नूह दस्तगिर बटनं मीराबाई चानूबद्दल अभिमानास्पद वक्तव्य केलंय. "जेव्हा मीराबाई चानूनं माझं कौतूक केलं आणि माझ्या कामगिरीचं कौतूक केलं. तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा होता". एवढेच नव्हे तर, मीराबाई चानू त्याची प्रेरणास्थान असल्याचंही नूह दस्तगिर बटनं म्हटलंय. दरम्यान, भारताकडून खूप प्रेम मिळालं, असंही तो म्हणाला.


नूह दस्तगिर बट- मीराबाई चानूची मैत्री
मीराबाई चानू आणि मी गेल्या सात - वर्षांपासून चांगले मित्र आहोत. परदेशात आम्ही अनेकवेळा एकत्रित प्रशिक्षण घेतलंय. तसेच आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कातही असतो. विशेष म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये पाकिस्ताननं पहिलंच सुवर्णपदक जिंकलंय. त्यानं 109 किलो वजनी गटातील स्नेच प्रकारात 172 किलो आणि क्लीन एंड जर्कमध्ये 232 किलोग्राम वजन उचललं असं एकूण त्यानं 405 किलोग्राम वजन उचललं.


कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू


सुवर्णपदक- 5  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)


रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)


कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर)


हे देखील वाचा-