Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 158 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. या स्पर्धेत भारतानं (India) आतापर्यंत 18 पदक जिंकली आहेत. तर, ऑस्ट्रेलियाच्या एकूण पदकांची संख्या 123 झालीय. त्याचबरोबर ब्रिटननं 103 पदकांवर कब्जा केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील सहाव्या दिवशी पाच पदक जिंकल्यानंतरही भारताची पदकतालिकेत एका स्थानानं घरसण झालीय. 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 38 सुवर्णपदकासह एकूण 123 पदकं जिंकली आहेत. तर, 38 सुवर्णपदकासह एकूण 103 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनाडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.  कॅनाडाच्या खात्यात आतापर्यंत 16 सुवर्णपदकासह एकूण 57 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (16 सुवर्ण, एकूण 36 पदक), पाचव्या क्रमांकावर स्कॉटलंड (7 सुवर्ण, एकूण 32 पदक), सहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (6 सुवर्ण पदक, एकूण 20 पदक), सातव्या क्रमांकावर भारत (5 सुवर्ण, एकूण 18 पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (4 सुवर्ण, एकूण 17 पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया(3 सुवर्ण, एकूण 8 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर नायजेरिया (3 सुवर्ण, एकूण 8 पदक).

कॉमनवेल्थ 2022 पदकतालिका-

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण पदक
1 ऑस्ट्रेलिया 46 38 39 123
2 इंग्लंड 38 37 28 103
3 कॅनडा 16 20 21 57
4 न्यूझीलंड 16 10 10 36
5 स्कॉटलंड 7 8 17 32
6 दक्षिण आफ्रीका 6 7 7 20
7 भारत 5 6 7 18
8  वेल्स 4 4 9 17
9 मलेशिया 3 2 3 8
10 नायजेरिया 3 1 4 8

 

हे देखील वाचा-