Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत (Commonwealth Weightlifting Games 2022) भारतीय खेळाडूंनी आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारताच्या महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला (India vs New Zealand) मात देत थेट अंतिम फेरी गाठली आहे. इतिहासात प्रथमच भारत लॉन बाऊल्सच्या अंतिम फेरीत पोहचला असून ज्यामुळे आता भारत फायनलमध्ये पराभूत झाला तरी उपविजेता म्हणून रौप्य पदकाचा मानकरी ठरणार आहे. पण भारताच्या रणरागिनी यावेळी अंतिम सामना जिंकून सुवर्णपदक मिळवण्याचे सर्व प्रयत्न करतील हे नक्की!






 


लॉन बॉल्सच्या सेमीफायनलमध्ये भारताने शानदार प्रदर्शन केलं आणि न्यूझीलंडला 16-13 च्या फरकाने मात दिली. यावेळी भारताच्या रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी दमदार खेळ दाखवला. भारताने निश्चित केलेल्या या पदकासह भारताच्या खात्यावर सात पदकं झाली असून हे सातवं पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावं लागेल. यावेळी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे.


कॉमनवेल्थ 2022 पदक तालिका


कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 22 सुवर्णपदकासह एकूण 52 पदकं जिंकली आहेत. तर, 11 सुवर्णपदकासह एकूण 34 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यंत 10 सुवर्णपदकासह एकूण 19 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका( 4 सुवर्ण, एकूण 6 पदक), पाचव्या क्रमांकावर कॅनडा (3 सुवर्ण, एकूण 18 पदक), सहाव्या क्रमांकावर भारत (3 सुवर्ण पदक, एकूण 6 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलँड (2 सुवर्ण, एकूण 17 पदक), आठव्या क्रमांकावर मलेशिया (2 सुवर्ण, एकूण 4 पदक), नवव्या क्रमांकावर नजेरिया (2 सुवर्ण, एकूण 3 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर वॉल्स (1 सुवर्ण, एकूण 9 पदक).


हे देखील वाचा-