Bhagatsingh Koshyari : 'मुंबईतून (Mumbai) गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेले तर ईथे पैसाच उरणार नाही'.. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nashik NCP) वतीने अनोखे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. शहरातून राज्यपालांना सहा हजार पत्र पाठविण्यास सुरुवात झाली आहे. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत संदर्भात वक्तव्य केले.  यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी देखील या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांनी यावर प्रखर शब्दात टीका केली आहे. तर अनेक ठिकाणी राज्यपालांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आता याच मुद्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहा हजार पत्र पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे.


राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासंदर्भात राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना सहा हजार पत्र पाठवणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या संदर्भात राज्यपालांनी चुकीचे विधान केले आहे. राज्यपालांना हि चूक लक्षात आणून देण्यासाठी पत्र पाठवणार आहोत, अशी प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात असून 'महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.. गेट वेल सून कोषारी तात्या' असा आशय त्यावर नमूद करण्यात आलाय. आज नाशिकच्या मुख्य टपाल कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे..   


पत्रात काय म्हंटलय - 
राज्यपाल महोदय आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्राचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की आपण राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी.. तरी आम्ही सर्वजण अशी प्रार्थना करतो की, आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाल. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेतांना आपण जी घटनात्मक शपथ घेतली होती तिचे प्रामाणिकपणे पालन कराल. तरी आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच माफक अपेक्षा.. आपला राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर


नेमकं प्रकरण काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी (29 जुलै) मुंबईतील चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल बोल्ट असताना त्यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही," असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.